दोन गावांत ५७८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 03:53 PM2020-02-26T15:53:01+5:302020-02-26T15:53:17+5:30
५७८ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण मंगळवारी सायंकाळपर्यंत करण्यात आले.
अकोला : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांपैकी पहिल्या टप्प्यात अकोला तालुक्यातील गोरेगाव व बाळापूर तालुक्यातील देगाव या दोन गावांत पात्र ८१० शेतकºयांच्या गावनिहाय याद्या सोमवारी प्रसिद्ध करण्यात आल्या असून, त्यापैकी ५७८ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण मंगळवारी सायंकाळपर्यंत करण्यात आले.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १२ हजार ३७९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात करण्यात आलेल्या १ लाख ११ हजार ३७७ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात अकोला तालुक्यातील गोरेगाव खुर्द -गोरेगाव बु. आणि बाळापूर तालुक्यातील देगाव या दोन गावांतील पात्र ८१० शेतकºयांच्या याद्या सोमवारी दोन्ही गावांत प्रसिद्ध करण्यात आल्या. प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यानुसार संबंधित शेतकºयांची बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी तसेच बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्ज खात्यातील रक्कम यासंदर्भात प्रमाणीकरणाचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले. त्यामध्ये दोन्ही गावांतील ८१० शेतकºयांपैकी ५७८ शेतकºयांच्या बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक प्रमाणीकरणाचे काम मंगळवारी सायंकाळपर्यंत करण्यात आले असून, उर्वरित २३२ शेतकºयांची पडताळणी आणि आधार प्रमाणीकरणाचे काम अद्याप बाकी आहे.
पडताळणीत १५ शेतकºयांच्या
बोटांचे उमटले नाही ठसे!
गोरेगाव आणि देगाव या दोन्ही गावात कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकºयांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामध्ये मंगळवारी दोन्ही गावात पडताळणीदरम्यान बायोमेट्रिक मशीनवर १५ शेतकºयांच्या बोटांचे ठसे उमटले नाही. त्यामुळे संबंधित शेतकºयांच्या पडताळणीचे काम तहसीलदारांमार्फत करण्यात येणार आहे. तसेच देगाव येथील एका शेतकºयाचा आधार क्रमांक चुकीचा असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. असे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.