आधार ‘लिंक’ नाही; शेतकऱ्यांची माहिती द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:47 PM2020-02-24T13:47:22+5:302020-02-24T13:47:28+5:30
७६३ शेतकºयांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तहसीलदारांकडून सोमवारपर्यंत मागविण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १२ हजार ३७९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी १७ फेबु्रवारीपर्यंत १ लाख ११ हजार ६१६ शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आले आहे. बँक खाते क्रमांकाशी आधार ‘लिंक’ करण्यात आले नसलेल्या उर्वरित ७६३ शेतकºयांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तहसीलदारांकडून सोमवारपर्यंत मागविण्यात आली आहे.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख १२ हजार ३७९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, पात्र ठरलेल्या शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांचे खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम गत दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे. त्यामध्ये कर्जमाफीसाठी पात्र १ लाख १२ हजार ३७९ शेतकºयांपैकी १ लाख ११ हजार ६१६ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आले असून, उर्वरित ७६३ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक अद्याप आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आले नाही.
त्यानुषंगाने बँक खाते क्रमांकाशी आधार क्रमांक ‘लिंक’ नसलेले शेतकरी संबंधित गावांत आहेत की नाही, संबंधित शेतकºयांचा पत्ता, बँक खाते क्रमांक व आधार क्रमांक प्राप्त झाले नाही, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तहसीलदारांकडून सोमवार, २३ फेबु्रवारीपर्यंत माहिती मागविण्यात आली आहे.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांपैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी अद्याप ‘लिंक’ करण्यात आले नाही, अशा शेतकºयांची माहिती जिल्ह्यातील सातही तहसीलदारांकडून २३ फेबु्रवारी रोजी मागविण्यात आली आहे.
- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी