आदित्य म्हणाले मंदी आहेच, रोजगारावर भर द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:46 PM2019-08-30T12:46:41+5:302019-08-30T12:58:24+5:30
रोजगारावर, इंडस्ट्रिज उभारणीवर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू, असे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी येथे सांगितले.
अकोला: देशामध्ये मंदीचे वातावरण आहे. नोकºया गमवाव्या लागत आहेत. जुन्या शिक्षण पद्धतीनुसार कितीही शिकले तरी नोकºया मिळत नाही. त्यामुळे शिक्षण पद्धती बदलून करिअर ओरिएन्टेड शिक्षण पद्धती लागू करण्याची गरज आहे. रोजगारावर, इंडस्ट्रिज उभारणीवर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू, असे शिवसेना प्रणित युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी येथे सांगितले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित आदित्य संवाद कार्यक्रमात युवकांच्या प्रश्नांना ते उत्तरे देत होते. शिक्षण पद्धती, आरक्षण, महिलांची सुरक्षा, कोचिंग क्लासेसचे वाढलेले शुल्क, महाविद्यालयांमधील मॅनेजमेंट कोटा आदी विषयांवर युवक-युवतींनी विचारलेल्या प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी उत्तरे दिली. आदित्य ठाकरे यांनी संवाद साधताना, शाळा, महाविद्यालय, कार्यालयांमध्ये महिला, युवतींना सुविधा मिळायला हव्यात, त्याकडे आपण लक्ष देणार असल्याचे सांगितले. यासोबतच शिक्षण हे कोण्याही वर्गाची मक्तेदारी नाही. सर्वांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. त्यात गरीब, श्रीमंत असा भेद होऊ नये. शिक्षणातून आर्थिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेशासाठी लाखो रुपये डोनेशन घेतल्या जाते. याला प्रतिबंध घालण्याची विनंती एका विद्यार्थिनी आदित्य ठाकरे यांना केली असता, त्यांनी, मॅनेजमेंट कोटा शासन लवकरच रद्द करणार आहे. डोनेशनचा प्रश्न कधी सुटणार नाही; परंतु ते डोनेशन वैध करण्यासाठी प्रयत्न करू. सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी आपण संघर्ष करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, आदित्य ठाकरे म्हणाले, आरक्षण हे आर्थिक निकषांवर असावे; परंतु अद्यापही अनेक जातींना आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे आरक्षण हा विषय सध्या तरी बाजूला सारला जाणार नाही. एका विद्यार्थिनीच्या कोचिंग क्लासेसच्या वाढत्या शुल्कामुळे गरिबांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यासाठी आपण शुल्क नियंत्रणासाठी प्रयत्न करणार का, या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी, त्यासाठी शुल्क नियंत्रण कायद्याची गरज असून, तो आणण्यासाठी शासनावर दबाव आणणार असल्याचे स्पष्ट केले. रोजगार, करिअरच्या प्रश्नाबाबत बोलताना, त्यांनी शिक्षणपद्धती, अभ्यासक्रम बदलण्याची गरज आहे. शिक्षणही घेऊनही युवकांना नोकरी मिळत नसल्याची वस्तुस्थिती युवकांसमोर मांडली.
अन् ती विद्यार्थिनी झाली भावुक!
एका विद्यार्थिनीने एसटी महामंडळात तिचे वडील कार्यरत असून, त्यांना १७ हजार रुपये पगार आहे. एवढ्या पगार मुलांचे शिक्षण होऊ शकत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाचे खासगीकरण न करता, शासनात हा विभाग विलीन करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का, असा प्रश्न विचारला. प्रश्न विचारताना, तिने वडिलांची परिस्थिती कथन केली आणि तिला रडू कोसळले. यासाठी काहीतरी करा, अशी आर्त विनवणी तिने केली. तिच्या विनवणीला प्रतिसाद देत, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी, यासाठी जरूर प्रयत्न करेल, असे आश्वासन तिला दिले.
शेतकऱ्यांना सरसकटच कर्जमाफी हवी!
शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना अटी लादल्या. या अटी आम्हाला मान्य नाहीत. शेतकºयांना सरसकटच कर्जमाफी हवी. त्यासाठी शासनासोबत आम्ही भांडण मांडले आहे. सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.