अल्पसंख्याक शाळांमधील ५0 अतिरिक्त शिक्षकांचे लवकरच समायोजन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:05 PM2018-04-09T14:05:49+5:302018-04-09T14:05:49+5:30
अकोला : जिल्ह्यातील अल्पसंख्याक शाळांमधील ५0 (उर्दू) अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित करण्यात आल्यानंतर अनेक शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे हरकती नोंदविल्या.
अकोला : जिल्ह्यातील अल्पसंख्याक शाळांमधील ५0 (उर्दू) अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित करण्यात आल्यानंतर अनेक शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे हरकती नोंदविल्या. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद हे शिक्षकांनी नोंदविलेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांच्या अडचणी ऐकून घेतली. त्यामुळे लवकरच केलेल्या नियोजनानुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
शिक्षणाधिकाºयांकडे अतिरिक्त शिक्षकांनी दाखल केलेल्या हरकतींवर येत्या काही दिवसांत संबंधित शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर सुनावणी सुरू होईल. सुनावणीची प्रक्रिया आटोपल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांची संपूर्ण माहिती त्यांच्या लॉगिनवर गोळा होईल. जिल्ह्यातील उर्दू विभागाचे ५0 शिक्षक अतिरिक्त ठरले असून, केवळ तीन जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर समायोजन करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने नियोजन करीत आहे. येत्या काही दिवसांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची अंतिम यादी निश्चित होईल. त्यानंतर समायोजनाची तारीख निश्चित करण्यात येईल. समायोजन करताना कोणत्याही अतिरिक्त शिक्षकावर अन्याय होऊ देणार नसल्याचे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी स्पष्ट केले आहे. रिक्त पदे असलेल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये केवळ तीनच शिक्षकांचे समायोजन होणार आहे. परंतु, उर्वरित ४७ शिक्षकांचे समायोजन होईल की नाही, याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे. परंतु, शासन निर्णयानुसार अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिकेच्या शाळांमध्ये समायोजन करता येऊ शकते. त्यामुळे या शाळांमधील शिक्षणाधिकारी १00 टक्के समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करतात का? की अतिरिक्त शिक्षकांना विभाग स्तरावर पाठवतात, याकडे शिक्षकांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)