दस्तऐवजाच्या सुरक्षेवर प्रशासनाने दिला भर

By Admin | Published: September 13, 2014 01:11 AM2014-09-13T01:11:05+5:302014-09-13T01:11:05+5:30

प्रभाव लोकमत स्टिंग ऑपरेशनचा: अकोला तहसीलदारांच्या कक्षासमोर दोन कर्मचार्‍यांची नेमणूक

Administer the security of the document | दस्तऐवजाच्या सुरक्षेवर प्रशासनाने दिला भर

दस्तऐवजाच्या सुरक्षेवर प्रशासनाने दिला भर

googlenewsNext

अकोला : शासकीय कार्यालयांमधील अधिकार्‍यांच्या दालनात महत्त्वपूर्ण दस्तऐवज असुरक्षित असल्याचे ह्यस्टिंग ऑपरेशनह्ण शुक्रवारी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले. कार्यालयातील महत्त्वपूर्ण दस्तऐवजाच्या सुरक्षेवर भर देत विभागप्रमुखांनी कार्यालयांमधील अधिकारी -कर्मचार्‍यांना सूचना दिल्या. तसेच अकोला तहसीलदारांच्या दालनासमोर दोन कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली. जिल्ह्यातील विविध सरकारी-निमसरकारी कार्यालयांमध्ये अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या टेबलवर असलेल्या महत्त्वपूर्ण फाईल्स व दस्तऐवजाची सुरक्षा करणारे कोणीही नसते. तसेच अधिकार्‍यांच्या कक्षाच्या प्रवेशद्वारावर येणार्‍या-जाणार्‍यांना विचारपूस करण्यासाठी व हटकण्यासाठी कोणीही नसते. त्यामुळे अधिकार्‍यांच्या दालनातील महत्त्वपूर्ण दस्तऐवज असुरक्षित असल्याची बाब गुरुवारी लोकमत चमूने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळून आली होती. ह्यअधिकार्‍यांच्या दालनातील दस्तऐवज असुरक्षितह्ण या शीर्षकाखाली ह्यस्टिंग ऑपरेशनह्णचे वृत्त शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले. कार्यालयातील अधिकार्‍यांच्या टेबलवरील दस्तऐवजासह कार्यालयातील दस्तऐवज आणि फाईल्स सुरक्षित राहिल्या पाहिजे, कार्यालयात येणार्‍या-जाणार्‍यांची विचारपूस केली पाहिजे, यासंदर्भात विविध विभागप्रमुखांनी कार्यालयातील अधिकारी-कर्मचार्‍यांना शुक्रवारी सूचना दिल्या. अकोला तहसीलदारांच्या कक्षासमोर दोन कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येत असल्याचा आदेश तहसीलदार संतोष शिंदे यांनी काढला. तहसीलदार कक्षात नसताना, कक्षात कोणीही जाणार नाही, अशा सूचना दिल्या. तसेच उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी कार्यालयातील महत्त्वपूर्ण दस्तऐवज व फाईल्स सुरक्षित ठेवण्याच्या सूचना कर्मचार्‍यांना दिल्या. याशिवाय जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात अधिकारी कक्षात अनुपस्थित असल्यास कार्यालयातील दस्तऐवज सुरक्षित असायला हवा, तसेच कार्यालयात येणार्‍या-जाणार्‍यांची विचारपूस कक्षाच्या प्रवेशद्वारावर कार्यरत कर्मचार्‍यांनी केली पाहिजे, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन अंबाडेकर यांनी दिल्या.

Web Title: Administer the security of the document

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.