विमा ‘कवच’ देण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ३६४५ शेतकऱ्यांना घेतले दत्तक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 02:27 PM2018-05-23T14:27:47+5:302018-05-23T14:27:47+5:30
अकोला : मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ३ लाख १६ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच देण्यात येणार आहे.
अकोला : मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ३ लाख १६ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा विमा काढण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासनामार्फत गत तीन दिवसांत राबविण्यात आलेल्या मोहिमेत महसूल, कृषी व ग्राम विकास विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील ३ हजार ६४५ शेतकऱ्यांना दत्तक घेऊन, त्यांच्या विमा हप्त्यासह ‘एफडी’ची रक्कम जमा केली.
मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत पात्र गरीब,गरजू व वंचित लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. वार्षिक १२ रुपये हप्ता (प्रीमियम )असलेल्या मिशन पंतप्रधान सुरक्षा विमा योजना अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात सन २०१८-१९ या वर्षात अकोला जिल्ह्यातील ३ लाख १६ खातेदार शेतकºयांना विमा योजनेत सहभागी करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. विमा काढलेल्या शेतकºयांच्या नावे प्रत्येकी २२० रुपये मुदत ठेव (एफडी) संबंधित बँकेत जमा करण्यात येत आहे. विमा हप्ता आणि ‘एफडी’ची रक्कम जिल्हा प्रशासनामार्फत जमा करण्यात येत आहे. त्यामध्ये अधिकारी -कर्मचाºयांसह स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेण्यात आला आहे. विमा काढण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्ज भरण्याची मोहीम २० ते २३ मे दरम्यान जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आली. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांमार्फत विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज भरण्यात आले असून, विमा काढलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज संबंधित बँकेकडे देण्यात येत आहेत. या माहिमेत महसूल, कृषी व ग्राम विकास विभागातील अधिकारी -कर्मचाऱ्यांसह तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांनी जिल्ह्यातील ३ हजार ६४५ शेतकºयांना दत्तक घेऊन, त्यांचा विमा काढला. त्यांच्या विमा हप्ता व ‘एफडी’ची रक्कम अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली.
सुरज गोळे यांनी दिला ५८०० रुपयांचा धनादेश!
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांचा विमा काढण्यासाठी अकोला आकाशवाणीचे प्रसारण अधिकारी सुरज गोळे यांनी ५ हजार ८०० रुपयांचा धनादेश मंगळवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, निवासी उप-जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे उपस्थित होते.