मतदानासाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:16 AM2021-01-15T04:16:20+5:302021-01-15T04:16:20+5:30
तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या ३२२ जागांसाठी १५ जानेवारी राेजी मतदान होत असून, मतदान केंद्रांवर गुरुवारी पथके रवाना ...
तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या ३२२ जागांसाठी १५ जानेवारी राेजी मतदान होत असून, मतदान केंद्रांवर गुरुवारी पथके रवाना झाली आहेत. तालुक्यातील ३२२ सदस्य पदांसाठी ६५४ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
तेल्हारा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण ६ निवडणूक निर्णय अधिकारी राहणार असून, राखीव २, झोनल अधिकारी ७, राखीव १ असे कर्मचारी तैनात असणार आहेत. या निवडणुकीसाठी एकूण ६०० कर्मचारी नियुक्त केले असून, इतर १०० सुरक्षा कक्ष राहणार आहेत. तसेच मतमोजणी तहसील कार्यालय, तेल्हारा येथे हाेणार आहे.
तालुक्यात निवडणूक होणाऱ्या एकूण ग्रामपंचायती ३४
बिनविरोध ग्रामपंचायती २
निवडणूक सदस्य संख्या ३२२
बिनविरोध निवड ८५
रिक्त पदे २
प्रत्यक्ष निवडणूक सदस्य संख्या २६५
प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या ६५४
बिनविरोध निवडणूक प्रभाग २२
संवेदनशील मतदान केंद्र २४
----------------------
असा राहील पोलीस बंदोबस्त
२ पोलीस निरीक्षक
१० एपीआय, पीएसआय
१५२ पोलीस कर्मचारी
एक एसआरपी प्लाटून
१०६ होमगार्ड
एकूण मतदार स्त्री ३३,५९९
एकूण मतदार पुरुष ३८,०९७
बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती
खेल सटवाजी
चांगलंवाडी
.............................
शासनाने तेल्हारा तालुक्यातील एकूण ३४ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, सर्व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून निवडणूक शांततेत पार पाडून शासनाला सहकार्य करावे.
राजेश गुरव, तहसीलदार
तथा तालुका निवडणूक अधिकारी