म्युकरमोयकोसिसच्या रुग्णांसाठी पाच लाखापर्यंत खर्च प्रशासनाने द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:18 AM2021-05-22T04:18:21+5:302021-05-22T04:18:21+5:30
अकोला : महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अकोला जिल्हयातील रुग्णालयात म्युकरमोयकोसिसवर उपचार करता येत नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ...
अकोला : महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अकोला जिल्हयातील रुग्णालयात म्युकरमोयकोसिसवर उपचार करता येत नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच सामान्य रुग्णालय येथे या आजारावरील उपचाराशी संबंधित यंत्रसामुग्री उपलब्ध नाही. अनेक रुग्ण खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. साधारणतः पाच ते साडेपाच लाख रूपये खर्च या आजारावरील उपचारासाठी येतो. यापैकी ५ लक्ष पर्यंतचा खर्च जिल्हा प्रशासनाने उचलावा, अशी मागणी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे.
जिल्हयात म्युकरमोयकोसिसवर उपचार करण्यासाठी सामान्य रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे या आजारावर उपचारासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध नाही. अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल हात आहेत. याठिकाणी प्रत्येक रुग्णावर पाच ते साडेपाच लक्ष रू. खर्च होतात. त्यामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांचे आर्थिकदृष्टया कंबरडे मोडत आहे, ते कर्जबाजारी होत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आपण सदर रुग्णांना उपचार देऊ शकत नसल्याने जिल्हा परिषदेच्या विविध योजनांतर्गत या रुग्णांचा पाच लक्ष रू. पर्यंतचा खर्च आपण उचलणे आवश्यक आहे त्यामुळे हे संकट अधिक गडद होण्याआधी तातडीने जिल्हा प्रशासनाने सदर रूग्णांसाठी ५ लक्ष रू. खर्च उचलण्याचा निर्णय घेण्याची मागणी आमदार सावरकर यांनी केली आहे