सहा कुपनलिकांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:29 AM2021-02-23T04:29:03+5:302021-02-23T04:29:03+5:30
अकोला : पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील सहा गावांत १३ लाख ७५ हजार ८०६ रुपयांच्या निधीतून सहा कूपनलिकांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी ...
अकोला : पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील सहा गावांत १३ लाख ७५ हजार ८०६ रुपयांच्या निधीतून सहा कूपनलिकांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी दिला.
जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील पाच आणि बाळापूर तालुक्यातील एक अशा सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी सहा कूपनलिका उपाययोजनांच्या कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने सहा गावांत १३ लाख ७५ हजार ८०६ रुपयांच्या निधीतून सहा कूपनलिकांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेेंद्र पापळकर यांनी २२ फेब्रुवारी रोजी दिला. त्यानुसार संबंधित गावांमध्ये कूपनलिकांची कामे लवकरच सुरु होणार आहेत.
...या गावांसाठी मंजूर केली
कूपनलिकांची कामे !
तेल्हारा तालुक्यातील जाफ्रापूर, भोकर, निंभोरा खुर्द, निंभोरा बु. आणि बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे इत्यादी सहा गावांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सहा कूपनलिकांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
कामे ३१ मार्चपूर्वी
पूर्ण करण्याचे निर्देश!
पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली सहा कूपनलिकांची कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत.