सहा गावांत पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:53 PM2019-01-01T12:53:44+5:302019-01-01T12:53:49+5:30
अकोला : जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यातील सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ५ लाख ९३ हजार २६९ रुपये किमतीच्या सात विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी दि
अकोला : जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यातील सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ५ लाख ९३ हजार २६९ रुपये किमतीच्या सात विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
बार्शीटाकळी तालुक्यातील सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. त्यानुसार सहा गावांत ५ लाख ९३ हजार २६९ रुपये किमतीच्या सात विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला.
मान्यता दिलेली अशी आहेत गावे आणि कामे!
बार्शीटाकळी तालुक्यातील उजळेश्वर, घोटा, विझोरा, रेडवा व कान्हेरी सरप या पाच गावांमध्ये प्रत्येकी एक विंधन विहीर आणि पुनोती खुर्द या गावात दोन विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
कामे १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश!
बार्शीटाकळी तालुक्यात सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची मंजूर करण्यात आलेली सात विंधन विहिरींची कामे १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, याकडे लक्ष देण्यात यावे, असे निर्देशही जिल्हाधिकाºयांकडून संबंधित यंत्रणांना देण्यात आले.