१५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणांच्या कामांना प्रशासकीय मान्यता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 02:56 PM2019-03-22T14:56:04+5:302019-03-22T14:56:20+5:30
अकोला : जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, बार्शिटाकळी व मूर्तिजापूर या चार तालुक्यातील १५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १८ मार्च रोजी दिला.
अकोला : जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, बार्शिटाकळी व मूर्तिजापूर या चार तालुक्यातील १५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १८ मार्च रोजी दिला. त्यामध्ये नळ योजना विशेष दुरुस्ती व तात्पुरती पूरक नळ योजनेच्या कामांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील ३ , तेल्हारा तालुक्यातील ४, बार्शिटाकळी तालुक्यातील ५ आणि मूर्तिजापूर तालुक्यातील ३ अशा एकूण १५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी नळ योजना विशेष दुरुस्ती आणि तात्पुरती पूरक नळ योजनांच्या कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार चार तालुक्यातील १५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला. त्यामध्ये ११ नळ योजना विशेष दुरुस्ती व ४ तात्पुरती पूरक नळ योजनेच्या कामांचा समावेश आहे.
‘या’ गावांमध्ये मंजूर करण्यात आली कामे !
अकोला तालुका : लोणी, बाखराबाद, आपोती बु..
तेल्हारा तालुका : हिंगणी बु., टाकळी, सदरपूर, तळेगाव बु.
बार्शिटाकळी तालुका : पैसाळी, उजळेश्वर, पाराभवानी, जलालाबाद, विझोरा.
मूर्तिजापूर तालुका : रामखेड, आरखेड, गोरेगाव.