राज्यातील बाजार समित्यावर नेमणार प्रशासक मंडळ !

By admin | Published: March 27, 2015 01:24 AM2015-03-27T01:24:35+5:302015-03-27T01:24:35+5:30

हालचालींना वेग,माजी संचालक मंडळाला मात्र निवडणुकांचे वेध.

Administrator board to be set up in the state's market committee! | राज्यातील बाजार समित्यावर नेमणार प्रशासक मंडळ !

राज्यातील बाजार समित्यावर नेमणार प्रशासक मंडळ !

Next

अकोला: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर प्रशासक मंडळ नेमण्यात येणार असल्याचे संकेत असून,त्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, बाजार समित्यांच्या माजी संचालकांना मात्र निवडणुकीचे वेध लागले आहेत. मागील वर्षी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्याने पणन विभागाने या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कारभार शासकीय प्रशासकांकडे सोपवला होता. पण शेतकर्‍यांना पुरक सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माजी संचालक मंडळांनी शासनाकडे केल्याने या तक्रारींच्या आधारे तत्कालीन आघाडी शासनाने या बाजार समित्यांवर प्रशासक मंडळ नेमून प्रशासकपदाचा पदभारही सभापतींकडे सोपविला होता. राज्यात युतीचे सरकार येताच हे प्रशासक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, या बाजार समित्यांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. पण पुन्हा राज्यातील काही बाजार समित्याचे एकत्रीकरण करू न प्रशासक मंडळ नेमण्याच्या हालचालींना सुरू वात झाल्याचे संकेत आहेत. दरम्यान,मागीलवर्षी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यकाळ संपल्याने या समितीचे माजी सभापती शिरीष धोत्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेऊन बाजार समितीचा कारभार विद्यमान संचालक मंडळाकडे ठेवण्यासाठीचा स्थगनादेश मिळविला होता. तथापि, त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुका जाहीर न झाल्याने आणि या स्थगनादेशाची मुदत संपल्याने सहकार पणन विभागाने बाजार समितीवर शासकीय प्रशासकाची नियुक्ती केली होती.

Web Title: Administrator board to be set up in the state's market committee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.