अकोल्यातील उच्च माध्यमिक शाळा प्रवेश प्रचलित पद्धतीने घ्यावेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:24 AM2021-08-20T04:24:15+5:302021-08-20T04:24:15+5:30
शालेय शिक्षण संचालकांनी महाराष्ट्रात पाच जिल्ह्यांमध्ये वर्ग अकरावी विज्ञान प्रवेश ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचा आदेश काढला आहे. अकोला जिल्ह्याचा ...
शालेय शिक्षण संचालकांनी महाराष्ट्रात पाच जिल्ह्यांमध्ये वर्ग अकरावी विज्ञान प्रवेश ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचा आदेश काढला आहे. अकोला जिल्ह्याचा यामध्ये समावेश नाही. तीन वर्षांपासून अकोला शहरातील मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकारीसमवेत एक समिती गठित केली होती आणि नवीन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली होती; परंतु ती पारदर्शक नव्हती. यासंदर्भात मुख्याध्यापकांनी, प्रवेशाचे अधिकार आम्हाला परत द्या, अशा मागणीचे निवेदन दरम्यानच्या कालावधीत शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. कोविड १९ तथा इयत्ता दहावीचा उशिरा लागलेला निकाल, यासोबत अनेक अडचणी असून प्रवेशाला दीड-दोन महिने अजूनही उशीर होणार आहे. त्यामुळे शाळास्तरावर त्वरित प्रवेश घेण्याकरिता कारवाई करावी, अन्यथा यासंदर्भात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अकोला युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. दीपक बोचरे यांनी दिला. यावेळी त्यांच्यासमवेत युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश बुंदेले, राहुल कराळे, युवा सेना विधी सल्लागार उमेश शिंदे, कॉलेज कक्ष प्रमुख सौरव नागोसे, दिनेश गवळी, श्रीपाद पाटे आदी होते.