वडिलांच्या प्रेरणेतूनच पोलीस विभागात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:14 AM2021-06-20T04:14:41+5:302021-06-20T04:14:41+5:30
गजानन मानकर व त्यांचा मुलगा आकाश दोघेही पोलीस सेवेत अकोला : लहान वयातच वडिलांच्या वर्दीचे आकर्षण झाल्याने तसेच ते ...
गजानन मानकर व त्यांचा मुलगा आकाश दोघेही पोलीस सेवेत
अकोला : लहान वयातच वडिलांच्या वर्दीचे आकर्षण झाल्याने तसेच ते समाजासाठी काहीतरी देणे लागते या भावनेने कर्तव्य करीत असल्याने लहानपणापासूनच पोलीस खात्यात सेवा बजावावी अशी प्रेरणा वडिलांकडून मिळाली. त्यामुळे पोलीस खात्यात वडिलांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावत असल्याची माहिती खदान पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आकाश गजानन मानकर यांनी दिली. त्यांचे वडील गजानन आत्माराम मानकर हे रामदासपेठ पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत.
अकोट तालुक्यातील तरोडा येथील अल्पभूधारक शेतकरी असलेले आत्माराम मानकर यांचा मुलगा गजानन मानकर हे दहावी पास झाल्यानंतर पोलीस सेवेत दाखल झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा आकाश हा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पोलीस खात्यात दाखल झाला. सध्या दोघेही अकोला पोलिस दलात कार्यरत असून कुटुंबातील सदस्यांप्रमाणे ते अकोलेकरांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असल्याचे वास्तव आहे. कोरोनाच्या कालावधीतही दोन्ही बाप-लेकांनी कशाचाही विचार न करता सेवा बजावली. वडिलांच्या प्रेरणेमुळेच आकाश मानकर पोलीस दलात दाखल झाले असून यापुढे खात्यांतर्गत परीक्षा देऊन वरिष्ठ पदावर जाण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आकाश मानकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.