मनमोहक मे फ्लॉवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:17 AM2021-05-30T04:17:04+5:302021-05-30T04:17:04+5:30

गुलमोहर गुलमोहर (शास्त्रीय नाव : डिलॉनिक्स रेजिया) हा उष्ण प्रदेशात वाढणारा वृक्ष आहे. हा वृक्ष बहरात नसतानाही इतर वृक्षांपेक्षा ...

Adorable May Flower! | मनमोहक मे फ्लॉवर!

मनमोहक मे फ्लॉवर!

Next

गुलमोहर

गुलमोहर (शास्त्रीय नाव : डिलॉनिक्स रेजिया) हा उष्ण प्रदेशात वाढणारा वृक्ष आहे. हा वृक्ष बहरात नसतानाही इतर वृक्षांपेक्षा अधिक काळ हिरवाई टिकवतो.

बहावा

बहावाचे शास्त्रीय नाव ‘कॅशिया फिस्टुला’ हे नाव त्याच्या शेंगेवरून पडले. पाने संयुक्तपर्णी समसंख्य असून ४ ते ८ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो.

रेन लिली

रेन लिलीचे शास्त्रीय नाव झेफिरेन्थेस आहे. हे कंदवर्गीय फूल असून याचा प्रसार मुख्यतः उ. गोलार्धातील समशीतोष्ण कटीबंधात आहे.

मिनीरुट

मिनीरुटचे शास्त्रीय नाव रुवेलिया ट्युरोरोसा हे आहे. याला कमी प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते.

मंकी टेल

हे निवडुंग जातीचे फूल आहे. हा एक पायथ्यावरील जोमदार, एपिलिथिक (खडकांवर वाढणारा) निवडुंग आहे. प्रथम सरळ, नंतर लंब आणि ८.२ इंच लांब असतो.

बर्ड नेस्ट निवडुंग

बर्ड नेस्ट निवडुंग याचे शास्त्रीय नाव मॅमिलरिया लॉब्गीममा हे आहे. याला लहान फुले येतात. या फुलाचा रंग हा पिवळा असतो. याचा आकार लहान असतो.

क्रोन ऑफ थोर्न

क्रोन ऑफ थोर्न या फुलाचे शास्त्रीय नाव युफोरबिया मिली हे आहे. ही फुले वर्षभर झाडाला राहतात. हा मूळचा मादागास्करचा आहे.

Web Title: Adorable May Flower!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.