अडते, व्यापारी कोरोनाबाधित; मूर्तिजापूर बाजार समितीची खरेदी ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 08:07 PM2021-03-22T20:07:52+5:302021-03-22T20:13:12+5:30
Murtijapur APMC : गत तीन दिवसांपासून बाजार समिती मधिल धान्य खरेदी अनिश्चित काळासाठी ठप्प झाली आहे.
मूर्तिजापूर : कृषि त्पन्न बाजार समितील ३० अडते, व्यापारी, हमाल, मदतनीस यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गत तीन दिवसांपासून बाजार समिती मधिल धान्य खरेदी अनिश्चित काळासाठी ठप्प झाली आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी, अडते, हमाल, मदतनीस यांची कोरोना चाचणी करुन घेण्यासाठी १६ ते १९ मार्च चार दिवस तपासणी शिबीराचे आयोजन स्थानिक प्रशासनातर्फे घेण्यात आले. या दरम्यान बाजार समितील जणांची तपासणी करुन घेण्यात आली. यात व्यापारी, अडते, कर्मचारी, हमाल, मदतनीस यांची तपासणी करण्यात आली असून ५० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे पैकी ३० अडते, व्यापारी, हमाल व मदतनीस पॉझिटिव्ह आल्याने याचा परीणाम धान्य खरेदी विक्रीवर झाला असून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली. बाजार समितीत हजारो क्विंटल धान्य पडून असून त्याची प्रथम खरेदी करुन नंतरच बाहेरील धान्य खरेदीसाठी बाजार समिती खुली करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सर्व पॉझिटिव्ह रुग्णांना हेंडज येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे क्वारंटीन करण्यात आले आहे.
बाजार समितीत घेण्यात आलेल्या चाचणी दरम्यान अडते, व्यापारी, हमाल, मदतनीस असे ३० लोक पॉझिटिव्ह आले असल्याने खरेदी अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. तथापी बाजार समितीमध्ये पुर्वीच पडून असलेल्या मालाची खरेदी करुन नंतर बाजार समिती पुर्ववत सुरु करण्यात येईल.
- रितेश मडगे
सचिव, कृषि उत्पादन बाजार समिती, मूर्तिजापूर