अत्याधुनिक यंत्र देईल कॅन्सरला मात; विदर्भात नागपूरनंतर अकोल्यात सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 01:16 PM2019-03-08T13:16:29+5:302019-03-08T13:16:39+5:30
अकोला : कॅन्सरला मात देण्यासाठी येथील संत तुकाराम कॅन्सर इस्पितळामध्ये अत्याधुनिक रेडिएशन मशीन दाखल झाली आहे. विदर्भात नागपूरनंतर अकोल्यात ही सुविधा उपलब्ध झाल्याने शेकडो गरिबांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.
अकोला : कॅन्सरला मात देण्यासाठी येथील संत तुकाराम कॅन्सर इस्पितळामध्ये अत्याधुनिक रेडिएशन मशीन दाखल झाली आहे. विदर्भात नागपूरनंतर अकोल्यात ही सुविधा उपलब्ध झाल्याने शेकडो गरिबांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.
रेडिएशनच्या माध्यमातून कॅन्सरवर उपचार होत असला, तरी हे रेडिएशन शरिरासाठी घातक आहे; परंतु या रेडिएशनचा उपयोग आवश्यक त्याच ठिकाणी झाल्यास रुग्णांना होणारा त्रास कमी होऊ शकतो. त्या अनुषंगाने गत दोन दिवसांपूर्वी संत तुकाराम कॅन्सर इस्पितळात ‘लिनॅक’ ही कॅन्सरची मशीन दाखल झाली. त्याचा थेट लाभ गोरगरीब रुग्णांना मिळणार असून, अनेकांचे प्राण वाचविण्यासही मदत होईल. यासाठी संत तुकाराम कॅन्सर इस्पितळातर्फे गत चार वर्षांपासून शासनाकडे अनुदानाची मागणी सुरू होती; मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले. अखेर सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वीच ही मशीन अकोल्यात दाखल झाली. महिनाभरात या मशीनचा सेटअप तयार होणार असून, त्यानंतर ही मशीन रुग्णांच्या सेवेत येणार आहे. ही मशीन अत्याधुनिक असून, जिल्ह्यातीलच नव्हे, तर जवळपासच्या सर्वच कॅन्सरच्या रुग्णांसाठी जीवनदायीनी ठरणार आहे.
असे आहेत मशीनचे वैशिष्ट्य
फोटॉन व इलेक्ट्रॉन रेडिएशन
हवेतील मॉल्युकॉल्सचा आधार
लेझर गायडन्स
केवळ ट्युमरवरच रेडिएशन
ट्यूमरच्या आकारानुसार लेझर लाईट आकार बदलतो.
एकाच दिवसात १२५ रुग्णांवर उपचार
या मशीनच्या माध्यमातून कॅन्सरच्या १२५ रुग्णांवर एकाच दिवशी उपचार करणे शक्य होणार आहे. जलद गतीने उपचार होणार असल्याने कमी वेळेत जास्त रुग्णांना सेवा देणे शक्य होणार आहे. त्यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या रुग्णांना आर्थिक फटका बसणार नाही.
मागील चार महिन्यांपासून शासनाकडे या मशीनसाठी पाठपुरावा केला; परंतु यश मिळाले नाही. सामाजिक दायित्व म्हणून संत तुकाराम कॅन्सर इस्पितळामध्ये ही मशीन अखेर दाखल झाली असून, याचा फायदा गोरगरीब रुग्णांना मिळणार आहे.
- गिरीष अग्रवाल, संचालक, संत तुकाराम हॉस्पिटल संचालित संस्था, अकोला.