१५ तासांच्या मनधरणीनंतर ग्रामस्थ परतले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 01:04 AM2017-09-12T01:04:17+5:302017-09-12T01:04:45+5:30

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून  पुनर्वसित झालेले हजारो आदिवासी पुनर्वसित वस्तीत कोण त्याच सुविधा नसल्याने मूळगावी परतले होते. त्यांना पुन्हा  पुनर्वसनाच्या ठिकाणी परत नेण्याकरिता जिल्हाधिकार्‍यांनी  तब्बल १५ तास मनधरणी केली. मात्र, ते बधले नाहीत.  मात्र, मध्यरात्री आमदार बच्चू कडू व मेळघाटचे माजी  आमदार राजकुमार पटेल यांनी आदिवासींसोबत कोरकूमध्ये  संवाद साधत मध्यस्थी केली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार  पाण्डेय यांनी पुर्नवसित गावांमध्ये मूलभूत सुविधा पुरविणार,  अशी ग्वाही दिल्यावर दोन हजारांवर अदिवासी वाहनांमध्ये  बसून पुनर्वसित वस्तीत परतले.

After 15 hours of congratulation, villagers returned! | १५ तासांच्या मनधरणीनंतर ग्रामस्थ परतले!

१५ तासांच्या मनधरणीनंतर ग्रामस्थ परतले!

Next
ठळक मुद्देप्रशासनाची ग्वाही पुनर्वसित गावांमध्ये मूलभूत सुविधा पुरविणार! 

प्रभाव लोकमतचा
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून  पुनर्वसित झालेले हजारो आदिवासी पुनर्वसित वस्तीत कोण त्याच सुविधा नसल्याने मूळगावी परतले होते. त्यांना पुन्हा  पुनर्वसनाच्या ठिकाणी परत नेण्याकरिता जिल्हाधिकार्‍यांनी  तब्बल १५ तास मनधरणी केली. मात्र, ते बधले नाहीत.  मात्र, मध्यरात्री आमदार बच्चू कडू व मेळघाटचे माजी  आमदार राजकुमार पटेल यांनी आदिवासींसोबत कोरकूमध्ये  संवाद साधत मध्यस्थी केली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार  पाण्डेय यांनी पुर्नवसित गावांमध्ये मूलभूत सुविधा पुरविणार,  अशी ग्वाही दिल्यावर दोन हजारांवर अदिवासी वाहनांमध्ये  बसून पुनर्वसित वस्तीत परतले. यामुळे तीन दिवसांपासून  तणावात असलेल्या शासकीय यंत्रणेने रविवारी रात्री १ वाज ता मोकळा श्‍वास घेतला. 
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभाक्षेत्रातील सदर गावांचे  पुनर्वसन अकोट तालुक्यात करण्यात आले आहे. या  गावांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्याकरिता जिल्हाधिकारी  आस्तिककुमार पाण्डेय आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी  अभिजित बांगर यांनी  १0 सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते रात्री  १ वाजेपयर्ंत ग्रामस्थांशी संवाद साधून शासनाच्या योजना  आपल्यापयर्ंत तातडीने पुरविल्या जातील, असा दिलासा  ग्रामस्थांना दिला. 
अकोट तालुक्यातील पुनर्वसित  गुल्लरघाट, सोमठाणा,  धारगड, अमोना कासोद, केलपाणी  सोमठाणा लगत आणि  केलपाणी गुल्लरघाट लगत या गावांमध्ये  येत्या महिनाभरात  कामे पूर्ण केली जाणार आहेत. पुनर्वसित गावांमध्ये  कुठल्याही प्रकारे ग्रामस्थांना अडचण भासू दिली जाणार  नाही. असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय  यांनी केले आहे. 

३३५ घरकुल उभारणार! 
सोमवारी सकाळी जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांची  बैठक घेऊन पुनर्वसित गावांमध्ये तातडीने  विविध योजनें तर्गत सुविधा पुरविण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, शबरी  घरकुल योजनेतंर्गत गुल्लरघाट गावात ५५ घरकुल,  सोमठाणा गावात ३५, धारगड गावात ७५, अमोना कासोद  येथे ५९, केलपाणी सोमठाणा लगत येथे ७५ आणि केल पाणी गुल्लरघाट लगत येथे  ३६, असे एकूण 335 घरकुल  बांधण्यात येणार आहेत. 

५0७ शौचायलांची निर्मिती
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गुल्लरघाट गावात ७५  शौचालय,  सोमठाणा येथे १२८ शौचालय, धारगड येथे १0२  शौचालय, अमोना कासोद येथे २५ शौचालय, केलपाणी   सोमठाणा लगत येथे  १३७ शौचालय आणि केलपाणी  गुल्लरघाट लगत येथे ४0 शौचालय, असे एकूण ५0७  शौचालय बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

पाणीपुरवठा व अंगणवाडीची सुविधा 
सोमठाणा येथे अंगणवाडी इमारतीचे बांधकाम सुरू असून,  गुल्लरघाट येथे लवकरच अंगणवाडी इमारतीचे काम सुरू  करण्यात येणार आहे. सदर गावांमध्ये पाणीपुरवठा योजने तंर्गत दोन कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्री पेयजल योजनामध्ये  पाठविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ठा क्कर बप्पा योजनेंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण व सांडपाणी  नाल्यांच्या बांधकामासाठी ५२.५ लाख रुपयांच्या निधीस  जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली आहे. तसेच प्रकल्प  अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास विभागामार्फत  गावांतील नवयुवकांना रोजगार व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षणही  दिले जाणार आहे. 

समिती गठित, मुंबईत बैठक 
पुनर्वसित आदिवासींवर अन्याय झाल्याची कबुली देत त्यांना  न्याय मिळवून देण्यासाठी अमोना, नागरतास, गुल्लरघाट,  केलपाणी, सोमठाणा खु., सोमठाणा बु., धारगड, बारूखेडा  या आठ गावांतील प्रत्येकी एक प्रतिनिधी माजी आमदार  राजकुमार पटेल, आ. सुनील देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री व  सचिव प्रवीण परदेशी यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार  आहेत. 

Web Title: After 15 hours of congratulation, villagers returned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.