३२ हजारांवर शेतकरी बाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 02:24 AM2017-10-18T02:24:13+5:302017-10-18T02:24:38+5:30

कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ात थकबाकीदार शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. त्यामध्ये पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील १ लाख ९१ हजार १८७ थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, कर्जमाफीसाठी अपात्र ठरविण्यात आलेले २३ हजार ८६४ शेतकरी कर्जमाफीच्या लाभातून बाद झाले आहेत.

After 32 thousand farmers! | ३२ हजारांवर शेतकरी बाद!

३२ हजारांवर शेतकरी बाद!

Next
ठळक मुद्देकर्जमाफी जिल्हय़ात १ लाख ९१ हजार शेतकर्‍यांना मिळणार लाभ!

संतोष येलकर। 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ात थकबाकीदार शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. त्यामध्ये पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील १ लाख ९१ हजार १८७ थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, कर्जमाफीसाठी अपात्र ठरविण्यात आलेले २३ हजार ८६४ शेतकरी कर्जमाफीच्या लाभातून बाद झाले आहेत.
सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्याचे काम गत २४ जुलै ते २२ सप्टेंबर या कालावधीत पूर्ण करण्यात आले. त्यामध्ये जिल्हय़ात १ लाख ३८ हजार ९६२ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. त्यानंतर कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या गावनिहाय याद्यांचे चावडी वाचन करण्यात आले. त्यामध्ये कर्जमाफीच्या अर्जांंमधील माहितीची पडताळणी करण्यात आली, तसेच बँकांकडून थकबाकीदार शेतकर्‍यांचे ‘ऑडिट’ करण्यात आले. जिल्हय़ात थकबाकीदार, कर्जाची नियमित परतफेड करणारे आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेले एकूण २ लाख २४ हजार ५१ शेतकरी आहेत. त्यापैकी कर्जमाफीच्या अर्जांंची पडताळणी केल्यानंतर जिल्हय़ातील १ लाख ९१ हजार १८७ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या खातेदार शेतकर्‍यांचा समावेश आहे. उर्वरित ३२ हजार ८६४ शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी अपात्र ठरविण्यात आले. अपात्र ठरलेले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभातून बाद झाले आहेत.

७0 शेतकरी कुटुंबांचे कर्ज खाते  आज होणार ‘निल’! 
अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हय़ातील ७0 शेतकरी कुटुंबांना प्रतीकात्मक कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. कर्जमाफीची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करून कर्ज खाते ‘निल’ करण्यात येणार आहे.

कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १ लाख १२ हजार ४0६ आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे ७८ हजार ७८१ असे एकूण १ लाख ९१ हजार १८७ खातेदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, तर राष्ट्रीयीकृत बँकांचे ३२ हजार ८६४ खातेदार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरले आहे. पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यास १८ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे.
-जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था).

Web Title: After 32 thousand farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी