अखेर ६४ गावांचा पाणीपुरवठा पूर्ववत!
By admin | Published: September 21, 2016 02:05 AM2016-09-21T02:05:40+5:302016-09-21T02:05:40+5:30
काटेपूर्णा धरणातून सोडले पाणी; आठ दिवसांनंतर सुरू झाला पाणीपुरवठा.
अकोला, दि. २0 - महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा आठ दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा अखेर मंगळवारपासून पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांचा गत आठ दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र गतवर्षी पाणीटंचाईच्या परिस्थितीत गत उन्हाळ्यात खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. गत जुलैमध्ये पावसाच्या पाण्याने खांबोराजवळील उन्नई बंधारा भरला होता. त्यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत उन्नई बंधार्यातून ६४ गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला; परंतु ९ सप्टेंबर रोजी उन्नई बंधार्यातील पाणी संपले. बंधारा ह्यड्रायह्ण झाल्याने गत १२ सप्टेंबरपासून ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे पावसाळयातच ६४ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अकोला उपविभाग कार्यालयामार्फत अकोला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडे करण्यात आली होती. त्यानुषंगाने जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाटबंधारे विभागामार्फत महान येथील काटेपूर्णा धरणातून 0.८0 दशलक्ष मीटर पाणी काटेपूर्णा धरणात सोडण्यात आले. धरणातून पाणी सोडण्यात आलेले पाणी खांबोराजवळील उन्नई बंधार्यात पोहोचल्यानंतर २१ सप्टेंबरपासून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पूर्ववत सुरू करण्यात आला. त्यामुळे गत आठ दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा सुरू झाल्याने ६४ गावांमधील जलसंकट टळले आहे.