अकोटात ब्रेक के बादः कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी शभंरी ओलांडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:51 AM2021-02-20T04:51:51+5:302021-02-20T04:51:51+5:30

अकोटः ब्रेक के बाद अकोट तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने शभंरी ओलांडली आहे. गत १८ दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ...

After a break in Akota: Corona positive patients crossed the line! | अकोटात ब्रेक के बादः कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी शभंरी ओलांडली!

अकोटात ब्रेक के बादः कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी शभंरी ओलांडली!

Next

अकोटः ब्रेक के बाद अकोट तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने शभंरी ओलांडली आहे. गत १८ दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १८ फेब्रुवारी सकाळी पर्यंत १४६ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पंधरवड्यातील हा सर्वात मोठा घातक आकडा मानल्या जात आहे. शहरातील कोरोनाचे नियमाची उल्लंघन टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

अकोट तालुका विशेष करुन शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या जास्त आहे. बसस्थानक, चौका-चौकात व बाजारपेठ मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. कोरोनाचा असर कमी झाल्यागत लोक वावरत आहेत. माक्स, सोशल डिस्टंन्सिल पालन होत नसल्याचे गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष करून खाजगी बस व वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी कोंबले जातात तसेच साधा ताप असलेले रुग्ण ग्रामीण रुग्णालयात गेले असता या ठिकाणी सुद्धा त्यांना कोरोना बाबत योग्य मार्गदर्शन मिळत असल्याचेही अनुभव नागरिकांना येत आहेत केवळ खाजगी बाजारपेठेतील नव्हे शासकीय-निमशासकीय कार्यालयात सुद्धा कोरोना संदर्भातील नियम पाळतांना कोणी आढळून येत नाही. या व्यतिरिक्त सँनिटाझरचा

वापर सुद्धा कमी झाल्याचे दिसून येत आहे या सर्व गंभीर बाबींचा परिणाम कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्या वाढीस कारणीभूत ठरत आहे.

अकोट तालुक्यातील १ते१८ फेब्रुवारी पर्यंत १४६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोद आहे. ग्रामीण भागात ११ तर शहरात ९३ रुग्ण आहेत.शिवाय १८फेब्रुवारी रोजी २२ रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल आला असुन सांयकाळ पर्यत ही संख्या १५० च्यावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या अकोट शहरात हायरिक्स रुग्ण संख्या ५२८ तर ग्रामीण भागात १११ पोहचली आहे.

स्थानिक महसुल,नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने अकोट शहरातील प्रमुख रस्त्यावर व बाजारपेठेत ,दुकानात मास्क व शोसल डिस्टन्सिग नियम पाळत नाही. अशा लोकावर ,दुकानदार वर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यासाठी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. या पथकांत प्रत्येकी चार जणाचा समावेश आहे. दरम्यान नागरिकांनी सुध्दा कोरोना पासुन सुरक्षिता म्हणून जागृत राहणे काळाची गरज आहे.

Web Title: After a break in Akota: Corona positive patients crossed the line!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.