पती निधनानंतर सावरलेल्या मातेवर पुत्रवियोगाचा डोंगर, २० वर्षांचा संघर्ष पाठ सोडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 06:37 PM2018-06-11T18:37:47+5:302018-06-11T18:37:47+5:30

मोठी उमरीतील वंदना नंदागवळी यांचे पती लंकेश्वर नंदागवळी यांचे लग्नानंतर काही वर्षातच निधन झाल्यानंतर तीनही मुलांच्या पालनपोषनासह त्यांचे कुटुंबीय चालविण्यासाठी २० वर्षांपुर्वी सुरु झालेला संघर्ष आजही वंदना नंदागवळी यांचा पाठलाग करीत असल्याचे गोवा येथे घडलेल्या घटनेमूळे दिसून येत आहे.

after the death of her husband, son death | पती निधनानंतर सावरलेल्या मातेवर पुत्रवियोगाचा डोंगर, २० वर्षांचा संघर्ष पाठ सोडेना

पती निधनानंतर सावरलेल्या मातेवर पुत्रवियोगाचा डोंगर, २० वर्षांचा संघर्ष पाठ सोडेना

Next

- सचिन राऊत

अकोला : मोठी उमरीतील वंदना नंदागवळी यांचे पती लंकेश्वर नंदागवळी यांचे लग्नानंतर काही वर्षातच निधन झाल्यानंतर तीनही मुलांच्या पालनपोषनासह त्यांचे कुटुंबीय चालविण्यासाठी २० वर्षांपुर्वी सुरु झालेला संघर्ष आजही वंदना नंदागवळी यांचा पाठलाग करीत असल्याचे गोवा येथे घडलेल्या घटनेमूळे दिसून येत आहे. २० वर्षांपुर्वी पतीवर काळाने झडप घातल्यानंतर काळाने पुन्हा मुलांवर पलटवार करीत दोन पुत्र हिरावून नेल्याने वंदना नंदागवळी यांच्या जिवनापुढचे दुख वेदनेपलीकडचे आहे.

 विठ्ठल नगरातील रहिवासी लंकेश्वर व वंदना नंदागवळी या दोघांच्या संसार वेलीवर २० वर्षांपुर्वी शैलेष, प्रीतेश व चेतन या तिघांच्या रुपाने तीन कळ्या उमलल्यानंतर काळाने घात केला अन् लंकेश्वर नंदागवळी यांचे निधन झाले. कधी घराबाहेरही न गेलेल्या वंदना यांच्यावर अचानक तीन मुलांच्या पालनपोषनासह संसाराचा गाढा हाकण्याची मोठी जबाबदारी आली, जगावे की मरावे या विवंचनेत असतांनाच त्यांनी मनाशी घट्ट गाठ बांधून तीनही मुलांना मोठे करण्याचा चंग बाधला. अशातच त्यांना महावितरणमध्ये कामाची संधी मिळाली आणि २० वर्षांपासून सुरु केलेल्या संघर्षानंतर तीनही मुले कमावती झाली. यामधील शैलेष हा स्पोर्टस साहित्य विक्रीचे काम करायचा तर प्रीतेश पोलिस दलात कार्यरत झाला व चेतनचे शिक्षण सुरु होते. आईने केलेल्या २० वर्षांच्या संघर्षानंतर दोन मुलांनी आईला विश्रांती मिळावी म्हणून पुढाकार घेतला. मात्र नियतीने पुन्हा एकदा घात केला व पोलिस दलात असलेला प्रीतेश आणि शिक्षण घेत असलेला चेतन या दोघांचा गोव्यातील एका बीचवर पाण्यात बुडुन मृत्यू झाला. वंदनाबार्इंच्या संघर्षांची कहाणी एवढयावरच थांबत नाही, तर प्रीतेशची पत्नी काही महिन्यांचीच गर्भवती असल्याने आता या माउलीपुढेही उर्वरीत आयुष्य जगण्याचा व्दीधामनस्थीती निर्माण करणारा पेच तयार झाला आहे.

प्रीतेश नंदागवळी सन २००८ मध्ये अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस विभागात शिपाईपदी रुजू झाले होते. २०१० ते २०१५ या कालावधीत येवदा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पोलीस परिवहन महामंडळची परीक्षा पास होऊन दयार्पूर उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करीत होते. तसेच काही महिन्यांपासून दयार्पूर ठाण्याच्या वाहनावर चालकपदी काम करीत असताना २ जूनपासून रजेवर असताना हा अपघात घडला. 

Web Title: after the death of her husband, son death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.