दिवाळीनंतर होणार मीटरगेज रेल्वे मार्ग बंद!
By admin | Published: October 9, 2016 02:56 AM2016-10-09T02:56:54+5:302016-10-09T02:56:54+5:30
दक्षिण मध्य रेल्वे; अधिका-यांचे संकेत.
राम देशपांडे
अकोला, दि. 0८- जिल्हा प्रशासनाने संपादित केलेली जमीन, दक्षिण मध्य रेल्वेकडे हस्तांतरित केल्यानंतर अकोला-आकोट मीटरगेज परिवर्तनाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, तीन रेल्वे पूल उभारणीचे कंत्राटदेखील अलाट करण्यात आले आहे. मार्ग रुंदीकरणाकरिता ह्यरेल्वेह्णकडे पर्याप्त निधी उपलब्ध असून, दिवाळीनंतर अकोला-आकोट मीटरगेज रेल्वे मार्ग बंद करून काम सुरू होणार असल्याची शक्यता दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकार्यांनी व्यक्त केली आहे.
व्याघ्र प्रकल्पातून जाणार्या रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाची अद्याप परवानगी मिळाली नसली, तरी अकोला-आकोटदरम्यानचा मीटरगेज रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणास लवकरच म्हणजे दिवाळीनंतर प्रारंभ होणार असल्याची शक्यता सिकंदराबाद येथील रेल्वे बांधकाम विभागाचे अधिकारी नागभूषण यांनी वर्तविली आहे. या मार्गावरील तीन मोठय़ा रेल्वे पुलांच्या उभारणीसाठी मध्यंतरी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ती पूर्ण झाली असून, त्यांचे कंत्राट सिकंदराबादच्या कंपनीला देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मार्ग रुंदीकरणासाठी सध्याचा मीटरगेज रेल्वे मार्ग तातडीने बंद करण्याची गरज नसली तरी दिवाळीनंतर तो बंद केला जाऊ शकतो, असे मत त्यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केले.
आकोट-महू मार्ग सुरू राहणार
अकोला-आकोट रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणादरम्यान आकोट-महूदरम्यान मीटरगेज रेल्वे मार्ग सुरू राहणार असून, या मार्गावर महू पॅसेंजर नियमित धावणार असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले.