कारवाईनंतर गुटख्याचे भाव दामदुप्पट!
By admin | Published: July 19, 2016 01:53 AM2016-07-19T01:53:10+5:302016-07-19T01:53:10+5:30
गुटखा माफियांची अजब शक्कल; पोलिसांशीही लागेबांधे.
अकोला: प्रतिबंधित गुटख्याच्या साठय़ावर पोलिसांनी छापेमारी केल्यानंतर गुटख्याची छुप्या मार्गाने होणारी वाहतूक कमी न करता उलट गुटख्याचे दाम पोलिसांच्या नावाने दुप्पट करण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती उघड झाली आहे. गुटखा माफियांशी पोलिसांचे लागेबांधे असून यामधूनच माफियांनी ही नवी शक्कल वापरल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाने तीन महिन्यांपूर्वी पारस येथे गुटख्याचा ट्रक पकडून सुमारे ५0 लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला होता. त्यानंतर याच पथकाने एमआयडीसीमध्ये असलेल्या एका गोदामावर छापा मारून सुमारे ४0 लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. तब्बल एक कोटी रुपयांचा गुटखा दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत जप्त केल्याने गुटखा माफियांचे कंबरडे मोडल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या; मात्र गुटखा माफियांनी पोलीस कारवाईचा बाऊ करीत १00 रुपयांना असलेले गुटख्याचे पाकीट तब्बल १७0 ते १८0 रुपयांना विक्री करणे सुरू केले. ५0 लाख रुपयांचा हा फटका भरून काढण्यासाठी गुटखा माफियांना गत तीन महिन्यांपासून मोठय़ा जोमात कारभार सुरू केला आहे. विमल गुटख्यावरच सुरू असलेला अकोल्याचा कारभार आता सितार, काली बहार, पान बहार, १२0/३00 चा गुटखा, सुगंधित सुपारी आणि गोवा या गुटख्याचीही आवक मोठय़ा प्रमाणात सुरू केली आहे. या माध्यमातून पुन्हा गुटख्याच्या गोरखधंद्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू झाली असून याकडे अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलीस आता डोळेझाक करीत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने पोलिसांना सोबत घेऊन कारवाईचा धडाका सुरू केल्यास गुटखा माफियांचे धाबे दणाणल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागानेही तातडीने कामाला लागण्याची गरज आहे. गुटखा माफियांनी प्रत्येक पोलीस स्टेशनशी ह्यअर्थह्णपुर्ण संबंध जोपासल्याने पोलीस अधीक्षक मीणा यांच्या पथकाने कारवाया केलेल्या आहेत; मात्र त्यानंतर आता कारवाई थंड बस्त्यात असून पोलीस अधीक्षकांनी ठाणेदारांचे कान टोचल्यास आणखी गुटख्याचा साठा जप्त केल्या जाऊ शकतो.