अखेर टँकर इंधनासाठी दीड कोटी!

By admin | Published: June 16, 2016 02:20 AM2016-06-16T02:20:48+5:302016-06-16T02:20:48+5:30

५५ गावांमधील पाणी पुरवठा होणार सुरळीत; सीईओंचा आदेश.

After half an hour for tanker fuel! | अखेर टँकर इंधनासाठी दीड कोटी!

अखेर टँकर इंधनासाठी दीड कोटी!

Next

अकोला: खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी टंचाईग्रस्त ५५ गावांना पाणी पुरवठा करणार्‍या टँकरचा इधन खर्च भागविण्यासाठी अखेर जिल्हा परिषद सेस फंडातून १ कोटी ५0 लाखांचा अग्रिम निधी मंजूर करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अरुण विधळे यांनी बुधवारी दिला. त्यामुळे इंधन खर्चाअभावी ठप्प झालेला ५५ गावांमधील टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. जिल्ह्यातल्या खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६0 गावांना महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो; परंतु गतवर्षी झालेल्या अपूर्‍या पावसामुळे धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे या योजनेंतर्गत गावांना सुकळी येथील तलावातून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता. तलाव आटल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ५५ गावांना गत महिन्यापासून २६ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला; मात्र टँकरच्या डिझेलचा खर्च भागविण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने १३ जूनपासून संबंधित गावांमधील टँकरद्वारे पाणी पुरवठा ठप्प झाला. या संदर्भात ह्यलोकमतह्ण ने बुधवारच्या अंकात ह्यटँकरच्या इंधन खर्चाअभावी ५५ गावांचा पाणी पुरवठा ठप्पह्ण असे प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत, सीईओ अरुण विधळे यांनी बुधवारी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता एस.ए. तिडके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांची बैठक घेऊन चर्चा केली. ५५ गावांमध्ये पाणी पुरवठय़ासाठी टँकरच्या इधन व भाडे खर्च भागविण्यासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून १ कोटी ५0 लाखांचा अग्रिम निधी मंजूर करण्यात येत असल्याचा आदेश सीईओ विधळे यांनी दिला. मंजूर करण्यात आलेला निधी गुरुवारी अकोला पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे गत तीन दिवसांपासून ठप्प झालेला टंचाईग्रस्त ५५ गावांमधील टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.

Web Title: After half an hour for tanker fuel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.