आमदाराच्या मध्यस्थीनंतर बांबूचा ट्रक सोडला!

By admin | Published: March 7, 2016 02:16 AM2016-03-07T02:16:53+5:302016-03-07T02:16:53+5:30

कारंजातील घटना; शासननिर्णयानुसार परवानगी असल्याचा दावा.

After the intervention of the MLA left the bamboo truck! | आमदाराच्या मध्यस्थीनंतर बांबूचा ट्रक सोडला!

आमदाराच्या मध्यस्थीनंतर बांबूचा ट्रक सोडला!

Next

कारंजा (जि. वाशिम): यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातून कारंजा मार्गे मूर्तिजापूरकडे बाबूंची वाहतूक करताना आढळलेला ट्रक कारंजा वनविभागाच्या अधिकार्‍यांनी शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ताब्यात घेतला. हा ट्रक अकोला जिल्ह्यातील एका आमदाराच्या नातेवाइकाच्या मालकीचा असल्याचे वनविभागाच्या चौकशीदरम्यान स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. दारव्हा येथून बांबू भरलेला एमएच २७ एक्स १९0४ क्रमांकाचा ट्रक ५ मार्च रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास मूर्तिजापूरकडे जात होता. त्याचवेळी अकोला वन विभागाचे उपवनसंरक्षक हे दारव्हामार्गे अकोलाकडे जात होते. शंका आल्याने त्यांनी ट्रक थांबवून चौकशी केली असता, ट्रकमध्ये बांबू असल्याचे आणि ते दारव्हा येथून मूर्तिजापूरला नेण्यात येत असल्याचे ट्रकचालकाने सांगितले. त्यावेळी उपवनसंरक्षकांनी ट्रकमधील मालाची पाहणी केली असता, कळक व कटांग प्रजातीचे बांबू या ट्रकमध्ये भरले असल्याचे आढळून आले. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी त्यांनी हा ट्रक ताब्यात घेऊन कारंजा येथील वन परिक्षेत्र कार्यालयात आणला. त्या ठिकाणी बांबूचे खरेदीदार अक्षय मधुकर कुकडे यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे शासननिर्णयाची प्रत, बुरुड जातीचे प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड आढळून आले. त्या कागदपत्रांच्या आधारावर या समाजाला व्यवसायासाठी बांबू वाहतुकीचा अधिकार आहे, असा युक्तिवाद अक्षय कुकडे यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी अकोलाचे उपवनसरंक्षक प्र. ज. लोणकर, कारंजाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. यू. पठाण, वनरक्षक नांदूरकर, व्ही. बी. इंगळे, मूर्तिजापूरचे थोरात यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर वनअधिकार्‍यांनी कुकडे यांच्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी केली असता, त्यांना बांबू वाहतुकीचा अधिकार असल्याचे स्पष्ट झाले. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी पंचासमक्ष हा ट्रक आणि त्यामधील मालाचा पंचनामा करून मालासह सुपूर्दनाम्याद्वारे ट्रक मालकाच्या स्वाधीन केला. त्यामुळे तब्बल दोन ते तीन तास चाललेल्या या प्रकरणावर पडदा पडला. दरम्यान, याप्रकरणी कोणतेही कारण नसताना ट्रक ताब्यात घेतल्याने ट्रकमालकांनी नाराजी व्यक्त केली. आमदारांनी केली दोन तास चर्चा कारंजा वन विभागाच्या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या ट्रकमधील बांबूचे मालक अक्षय कुकडे हे मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांचे नातेवाईक असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी आमदार हरीश पिंपळे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. त्यानंतर थोड्याच वेळात आमदार हरीश पिंपळे हे स्वत: कारंजा वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांनी शासननिर्णयाचा हवाला देत याप्रकरणी मध्यस्थी केली.

Web Title: After the intervention of the MLA left the bamboo truck!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.