पाच तास थांबूनही रक्तपेढीने दिला रक्त संकलनास नकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:21 AM2021-09-11T04:21:15+5:302021-09-11T04:21:15+5:30

काय आहे तांत्रिक समस्या? रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांच्या मते रुग्णाच्या नातेवाइकांकडून आज किंवा उद्याच रक्त द्यावे. मात्र, संकलित केलेल्या रक्ताच्या संपूर्ण ...

After waiting for five hours, the blood bank refused to collect the blood! | पाच तास थांबूनही रक्तपेढीने दिला रक्त संकलनास नकार!

पाच तास थांबूनही रक्तपेढीने दिला रक्त संकलनास नकार!

Next

काय आहे तांत्रिक समस्या?

रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांच्या मते रुग्णाच्या नातेवाइकांकडून आज किंवा उद्याच रक्त द्यावे. मात्र, संकलित केलेल्या रक्ताच्या संपूर्ण चाचण्या केल्याशिवाय ते रुग्णाला देणे शक्य नाही. रात्रीच्या वेळी रक्ताच्या चाचण्या करणे शक्य नसल्याचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

रुग्णास रक्त देण्यास रक्तदाता तयार असूनही त्याचे रक्त संकलित केले जात नाही. आम्ही नेहमीच सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीला रक्तदान करतो. मात्र, जेव्हा आम्हाला गरज पडते तेव्हा आम्हाला रक्त मिळत नाही. त्यामुळे यापुढे आम्ही शासकीय रक्तपेढीला रक्त देणार नाही.

- आशिष सावळे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना

आजच संकलित केलेल्या रक्ताची चाचणी करून ते रुग्णाला आजच उपलब्ध करून देणे शक्य नाही. रात्रीच्या वेळी रक्ताची चाचणी करणे शक्य नाही. रक्ताच्या चाचण्या पूर्ण केल्याशिवाय ते आम्ही रुग्णाला देऊ शकत नाही. रक्तपेढीतर्फे रक्तसंकलनास नकार दिला नाही.

- डॉ. अजय जुनगरे, विभागप्रमुख, शासकीय रक्तपेढी, जीएमसी, अकोला

Web Title: After waiting for five hours, the blood bank refused to collect the blood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.