पुन्हा ‘सहकार’
By Admin | Published: September 9, 2015 01:58 AM2015-09-09T01:58:32+5:302015-09-09T01:58:32+5:30
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; शेतकरी पॅनलचा पराभव.
अकोला: अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सहकार पॅनलने दणदणीत विजय संपादन केला. शेतकरी पॅनलच्या उमेदवारांचा सर्वच १५ जागांवर पराभव करीत सहकार पॅनलने सहकार क्षेत्रातील वर्चस्व पुन्हा एकदा अबाधित राखले. मंगळवारी खदान परिसरातील शासकीय धान्य गोदाम येथे मतमोजणी करण्यात आली. जिल्हय़ातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदांच्या जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. त्यामध्ये सेवा सहकारी मतदारसंघातून २८, ग्रामपंचायत मतदारसंघातून ११, व्यापारी व अडते मतदारसंघातून ५ आणि हमाल व मापारी मतदारसंघातून २ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. या निवडणुकीत सहकार गटाचे शिरीष वसंतराव धोत्रे (सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण), राजेश अवचितराव बेले (सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण), बाबूराव रामभाऊ गावंडे (सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण), अभिमन्यू शंकर वक्टे (सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण), ज्ञानेश्वर नागोराव महल्ले (सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण), विठ्ठल प्रल्हाद चतरकर (सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण), देवेंद्र हरिभाऊ देवर (सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण), वर्षा गणेश गावंडे (सेवा सहकारी संस्था महिला), विद्या गजानन गावंडे (सेवा सहकारी संस्था महिला), नीळकंठ शालीग्राम खेडकर (सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्ग), प्रमोद रामकृष्ण लाखे (सेवा सहकारी संस्था भटक्या जाती/जमाती), अर्चना मुकेश मुरूमकार (ग्रामपंचायत सर्वसाधारण), शिवहरी ऊर्फ सुनील देवीदास परनाटे (ग्रामपंचायत सर्वसाधारण), संदीप शालीग्राम पळसपगार (ग्रामपंचायत अनुसूचित जाती/जमाती), मंदाकिनी गजानन पुंडकर (ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) या १५ उमेदवारांनी विजय संपादन केला. तसेच अडते व व्यापारी मतदारसंघातून चंद्रशेखर रामभाऊ खेडकर, रमेशचंद्र शिवरतन चांडक, हमाल व मापारी मतदारसंघातून चंदू छोटू चौधरी यांनी वियज मिळविला.