पुन्हा अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हुकला; लग्नसोहळे लॉकडाऊन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:18 AM2021-05-14T04:18:13+5:302021-05-14T04:18:13+5:30
--बाॅक्स-- नियमांचा अडसर गतवर्षी कोरोना संसर्गात लग्नासाठी ५० पाहुण्यांना परवानगी होती. तसेच विवाहासाठी वेळेचे कोणतेही बंधन नव्हते; परंतु यावर्षी ...
--बाॅक्स--
नियमांचा अडसर
गतवर्षी कोरोना संसर्गात लग्नासाठी ५० पाहुण्यांना परवानगी होती. तसेच विवाहासाठी वेळेचे कोणतेही बंधन नव्हते; परंतु यावर्षी शासनाने २५ पाहुणे आणि दोन तासात लग्न आटोपण्याची अट घातली. २५ पाहुण्यात लग्न एकदाचे होईलही, परंतु दोन तासात लग्न कसे शक्य आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या जाचक अटीपेक्षा कोरोना संसर्ग संपल्यानंतर धूमधडाक्यात लग्न करण्याचा निर्णय अनेक परिवारांनी घेतला. त्यामुळेच उन्हाळ्यातील लग्नसोहळे रद्द झाल्याचे दिसत आहे.
--बॉक्स--
मे महिन्यातील मुहूर्त
मे महिन्यात १, २, ३, ४, ५, ८, १३, १४, २०, २१, २२, २८, ३०, ३१ असे एकूण १४ मुहूर्त आहेत.
--बॉक्स--
मंगल कार्यालयांचे गणित बिघडले!
शहरामध्ये ०० मंगल कार्यालये आहेत. कोरोनाच्या प्रकोपामुळे त्यांच्या आर्थिक गणितावर विपरीत परिणाम झाला आहे.
प्रत्येक मंगल कार्यालयात वर्षाकाठी १०-१५ लग्नसोहळे पार पडतात. यावर्षी निर्बंधांमुळे मंगल कार्यालयांमध्ये एकही सोहळा पार पडताना दिसत नाही.
एका लग्नसोहळ्याला हजारो रुपयांची बुकिंग होते. संबंधित व्यक्ती गरजेप्रमाणे आणखी आर्थिक बजेट वाढविते; मात्र यंदा परिस्थिती कठीण आहे.
मंगल कार्यालयांमध्ये लग्नसोहळे बंद असल्याने मंगल कार्यालय मालकांसोबत त्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांनाही आर्थिक फटका बसत आहे.
यामध्ये केटरिंग, मंडप, डेकोरेशन, बँड पथक यांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. मागील वर्षभरापासून ही स्थिती कायम आहे.
--कोट--
यंदाही कर्तव्य नाही...
एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबातील सर्वांची धूमधडाक्यात लग्नसोहळा करण्याची इच्छा आहे; परंतु कोरोनामुळे ते शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे लग्नसमारंभ पुढे ढकलण्यात आला आहे.
- ईश्वर गजमोल, वरपिता
--कोट--
कोरोनामुळे मागील वर्षीपासून मुलगा बघण्याच्या कार्यक्रमात अडसर येत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने मुलगा बघण्याचा कार्यक्रम बंद केला आहे. त्यामुळे हा मुहूर्त टळणार आहे.
- रामभाऊ पाटील, वधुपिता