राजनापूर खिनखिनी गावात अगरबत्ती उद्योगाला चालना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:32 AM2021-02-18T04:32:30+5:302021-02-18T04:32:30+5:30
अगरबत्ती मशीनमुळे राजनापूर येथील ग्रामीण भागातील तरुण महिनाकाठी १० ते १८ हजार रुपये रोजगार मिळवू शकतात. तरुणांना अगरबत्ती ...
अगरबत्ती मशीनमुळे राजनापूर येथील ग्रामीण भागातील तरुण महिनाकाठी १० ते १८ हजार रुपये रोजगार मिळवू शकतात. तरुणांना अगरबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देणे चालू आहे. हा उद्योग निरंतर चालणारा असून, प्रत्येकाच्या घरी याची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्हा उद्योग केंद्र, अकोला यांच्यामार्फत महाराष्ट्रात विविध ठिकाणी अगरबत्ती व्यवसाय वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. एक गाव, एक उद्योग कार्यक्रमांतर्गत पालकमंत्र्यांचे दत्तक गाव राजनापूर येथे हा प्रयोग करण्यात आला. राजनापूर गावात ग्रामपंचायतीच्या सहकार्याने उद्योगाची निर्मिती करण्यात आली आहे. सरपंच प्रगती रुपेश कडू यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. जिल्हा उद्योग केंद्राचे संचालक लोंढे, निकम, रत्नपारखी यांनी यावेळी अगरबत्ती उद्योगाला भेट दिली. लवकरच पालकमंत्री बच्चू कडू उद्योगाचे लोकार्पण करणार आहेत. तसेच गावात आणखीही काही उद्योग आणण्याचा त्यांचा मानस आहे.
फोटो: