अकोल्यात व्यापारी संकुलात अग्नितांडव
By admin | Published: March 20, 2017 02:04 PM2017-03-20T14:04:19+5:302017-03-21T02:55:26+5:30
गांधी रोडवरील उत्सव संकुलमध्ये (आरआरसी संकूल) अचानक आग लागल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.
अकोला, दि. २0- गांधी रोडवरील उत्सव संकुलमध्ये (आरआरसी संकूल) अचानक आग लागल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या भीषण आगीत दैनीक सिटी न्युज सुपरफास्टचे कार्यालय, आरआरसी न्यूजचे कार्यालय, वाईन बार, ज्वेलर्स, झी महासेल, अॅडीओ कॅसेटचे प्रतिष्ठान व दोन मोबाईल शॉपीसह कापडाच्या दुकानातील साहित्य जळाले. यामध्ये या प्रतिष्ठान संचालकांची तब्बल ४० ते ५० लाख रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मनपाच्या अग्निशमन दलाच्या 4 वाहनाद्वारे आग विझविण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास या भिषन आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
गांधी रोडवर बंडु देशमूख यांच्या मालकीचे उत्सव संकुल असून या संकूलला सोमवारी पहाटे अचाणक आग लागली. या आगीत बंडु देशमूख यांच्या मालकीचे आर आर सी न्युज चॅनेलचे कार्यालय, सिटी न्युज सुपरफास्ट दैनिकाचे कार्यालय, विजय माळोकार यांच्या मालकीचे हॉटेल गिरीराज पॅलेस, 2 ज्वेलर्स, 2 मोबाईल शॉपी, कापडाचे दुकान, वाईन बारमधील साहित्य जळून खाक झाले आहे. या सर्व प्रतिष्ठानाना आग लागल्याने मोठया प्रमाणात मालमत्तेची हाणी झाली. या आगीत सर्व कार्यालय आणि प्रतिष्ठानामधील लाखो रुपयांचे साहित्य जळाले असून आर आर सी चॅनेल व दैनिकाच्या कार्यालयातील संगनक आणि यंत्रसाहित्यही आगीच्या भीषण तांडवात भक्ष्यस्थानी पडले आहे. या आगीची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपाच्या अग्निशमन दलाच्या 4 वाहनांद्वारे प्रयत्न करण्यात आले. तब्बल 7 बंब पाणी रिचवून आग विझविण्यात आली मात्र पहाटे लागलेली आग विझविण्यासाठी यंत्रणेला तब्बल दुपारी १२ वाजेल्याची माहिती आहे.
गांधी रोडवरील वाहतूक बंद
उत्सव संकुलमध्ये लागलेल्या आगीमुळे गांधी रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली होती, तसेच या परिसरातील बाजरपेठहि काही वेळ बंद ठेवण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले.
मोठा पोलीस बंदोबस्त
गांधी रोडवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही आग विझविण्यासाठी पोलिस यंत्रणाही झपाटयाने कामाला लागली होती. घटनास्थळावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह शहरातील सातहि पोलीस स्टेशनचे ठाणेदार हजर आहेत.
आगीचे कारण अस्पष्ट
उत्सव संकुलला लागलेल्या भीषण आगीचे कारण अस्पष्ट आहे. मात्र घटनास्थळावर विविध तर्कवितर्क लावण्यात येत होते. मार्च एंन्डींगच्या लगबगीत आग लागल्याने अनेकांनी वेगळया प्रकारची शंकाही घटनास्थळावर व्यक्त केली.