अकोल्यात ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 04:02 PM2018-04-11T16:02:44+5:302018-04-11T16:02:44+5:30

agitation of employees of 'NHM' in Akola; Demonstrate in front of the Collector Office | अकोल्यात ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

अकोल्यात ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

Next
ठळक मुद्देएनएचएम कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात केली. आंदोलनात एनएचएम अंतर्गत कार्यरत असलेले जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले.मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले.

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी रेटून धरण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी/कर्मचारी महासंघाने राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील एनएचएम कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.
आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने तुटपुंजा मानधनावर कार्यरत असलेले ‘एनएचएम’ कर्मचारी आरोग्यसेवेत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. समान काम-समान वेतन व कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी हे कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांना सेवेत सामावून घेण्याची शक्यता पडताळण्यासाठी आरोग्य विभागाने अभ्यास समिती गठित केली असतानाच, आयुक्त, आरोग्यसेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या कार्यालयाकडून २ एप्रिल रोजी राज्यभरातील जिल्हा कार्यालयांना कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मूल्यांकन अहवालाची एक्सलशिट पाठविण्यात आली आहे. यामध्ये कामाच्या स्वरूपानुसार गुणांकन पद्धती असून, त्यावर आधारित मूल्यांकन अहवाल तयार होणार आहे. मूल्यांकन अहवालानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ, नोकरीवर कायम ठेवणे किंवा कमी करणे, या बाबी निश्चित करण्यात येणार आहेत. कंत्राटी कर्मचाºयांना यापुढे सहा महिन्यांची पुनर्नियुक्ती देण्याच्या सूचनाही अतिरिक्त संचालकांनी दिल्या आहेत. आरोग्य विभागाच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात एनएचएम अंतर्गत कार्यरत असलेले जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले.

या आहेत मागण्या.....
एनएचएम कर्मचाऱ्यांचे समकक्ष पदावर विनाशर्त समायोजन.
समायोजन होईपर्यंत समान काम-समान वेतन देण्यात यावे.
अभ्यास समितीचा सकारात्मक अहवाल शासनास पाठविण्यात यावा.
सद्यस्थितीत कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी कोणालाही काढण्यात येऊ नये.

 

Web Title: agitation of employees of 'NHM' in Akola; Demonstrate in front of the Collector Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.