उमेद अभियानाच्या महिलांनी दिले धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 06:20 PM2020-10-12T18:20:40+5:302020-10-12T18:20:47+5:30
Dharna At Collector office Akolaजिल्हयातील कंत्राटी कर्मचारी, केडर, स्वयंसहायता समुहाच्या महिला सहभागी झाल्या होत्या
अकोला: महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारयांची सेवा बा' .... कडे वर्ग न करता पूर्ववत कायम करण्यात यावी यासह इतर विविध मागण्यांसाठी उमेद अभियानच्या जिल्'ातील कर्मचारयांसह स्वयंसहायता समुहाच्या महिलांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारयांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. उमेद अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारयांना तात्काळ पुर्ननियुक्ती देण्यात यावी, कोणत्याही बा' सं.......कर्मचारी नियुक्तीचे अधिकार देण्यात येउ नये, उमेद अभियानाच्या मूळ मनुष्यबळ संसाधन धोरणानुसारच कंत्राटी कर्मचार्यांची पदे कायम ठेवण्यात यावी, महिला स्वयंसहायता समूह, ग्रामसंघ, प्रभागसंघांना दिला जाणारा खेळता भांडवल निधी , समुदाय गुतवणूक निधी, जोखीम प्रवणता निधीमध्ये दुप्पट वाढ करण्यात यावी व निधी वेळेत देण्यात यावा, अभियान अंतर्गत ग्रामस्तरावरील सर्व केडर सखी व प्रेरिकांचे मानधन वाढवून दहा हजार रुपये करण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी उमेद अभियान अंतर्गत जिल्'ातील कंत्राटी अधिकारी, कर्मचारी, स्वयंसहायता समुहाच्या महिलांनी जिल्हाधिकारी कायार्लयासमोर धरणे दिले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारयांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. उमेद अभियानच्या जिल्हा समन्वयक व जिल्हा परिषद माजी सदस्य प्रतिभा अवचार यांच्या नेतृत्वात या धरणे आंदोलनात जयश्री वानखडे, निलम वानखडे, उमा महल्ले, अनुसया ढोले, रत्ना तेलगोटे, पूजा पाटील, रुखसाना परवीन, अर्चना गायकवाड यांच्यासह जिल्हयातील कंत्राटी कर्मचारी, केडर, स्वयंसहायता समुहाच्या महिला सहभागी झाल्या होत्या. ...तर तीव्र आंदोलनाचा इशारा! शासनाने मागण्यांची तातडीने दखल घेउन कार्यवाही करावी, नाही तर उमेद अभियानांतर्गत अधिकारी, कर्मचारी स्वयंसहायता समुहाच्या महिला मुंबइत तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.