समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयात बांधले बेशरमचे तोरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 03:21 PM2019-09-06T15:21:25+5:302019-09-06T15:22:35+5:30

समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयात बेशरमचे तोरण बांधून निषेध नोंदविण्यात आला.

Agitation at office of Assistant Commissioner of Social Welfare! | समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयात बांधले बेशरमचे तोरण!

समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयात बांधले बेशरमचे तोरण!

googlenewsNext

अकोला : जिल्ह्यात रमाई आवास योजनेची अंमलबजावणी रेंगाळल्याने, वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखेच्यावतीने गुरुवारी समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयात बेशरमचे तोरण बांधून निषेध नोंदविण्यात आला.
रमाई आवास योजनेंतर्गत अकोला महानगरपालिकासह जिल्ह्यातील नगरपालिका अंतर्गत घरकुलांची कामे गत दोन वर्षांपासून रेंगाळली आहेत. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना व्यवस्थित राबविण्यात येत असताना, रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल कामांसाठी जिल्हा समाजकल्याण विभागामार्फत निधी मंजूर करण्यात येत नाही. गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात रमाई आवास योजनेची अंमलबजावणी रखडल्याने वंचित बहुजन आघाडी, युवक आघाडी जिल्हा शाखेच्यावतीने समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयात कार्यालयाच्या फलकाला बेशरमचे तोरण बांधून निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर रमाई आवास योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निवेदन समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयाच्या अधीक्षकांना देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे, प्रदेश संघटिका अरुंधती सिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, दिनकर वाघ, मनोहर पंजवाणी, केशव बिलबिले, गजानन गवई, सम्राट सुरवाडे, राजुमिया देशमुख, गजानन दांडगे, प्रकाश कंडारकर, सचिन शिराळे, विकास सदांशिव, शेख साबीर, आकाश सिरसाट, सुरेंद्र तेलगोटे, मुस्ताक शहा, सिद्धार्थ सिरसाट, संतोष वनवे, युनुस पटेल, अभिमन्यू धांडे, सुनील इंगळे, किरण इंगळे, मिलिंद आकोडे, सिद्धार्थ वानखडे, सचिन कांबळे, संतोष गवई यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


...लक्षवेधी मोर्चा काढणार!
येत्या १० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात रमाई आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू करून, घरकुल कामांसाठी निधी मंजूर करावा, अन्यथा समाजकल्याण कार्यालयाच्या कारभाराविरोधात लक्षवेधी मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीच्यावतीने समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला.

Web Title: Agitation at office of Assistant Commissioner of Social Welfare!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.