महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 10:48 AM2021-06-22T10:48:55+5:302021-06-22T10:49:02+5:30

Akola News : अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून केंद्र व राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.

Agitation of Vanchit Bahujan Aaghadi against inflation | महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार

महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार

googlenewsNext

अकोला : पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे जनता त्रस्त झाली आहे. खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत. कोरोनामुळे आधीच अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडले. त्यात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. अशा परिस्थितीत जीवन कसे जगावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाढत्या महागाईच्या विरोधात सोमवारी दुपारी गॅस सिलिंडर घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून केंद्र व राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात, वाढती इंधन दरवाढ चिंताजनक असून, कोरोनामुळे आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. महागाईमुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. महागाईची झळ सोसावी लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाने महागाईवर नियंत्रण आणून, पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलिंडर, खाद्यतेलाच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, अरुंधती शिरसाट, वंदना वासनिक, नगरसेविका किरण बाेराखडे, प्रतिभा अवचार, राजेंद्र पातोडे, माजी सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, कलीम खान पठाण, प्रमोद देंडवे, शंकरराव इंगळे, गजानन गवई, नितीन सपकाळ, मधुकर गोपनारायण, दीपक गवई, सचिन शिराळे, गजानन दांडगे, मनोहर बनसोड, उमा अंभोरे, पंकज मेतकर, आकाश अहिरे, संदीप शेरेकर, रामाभाऊ तायडे, संजय निलखन, शंकर इंगोले, राष्ट्रपाल डोंगरे, प्रभाकर अवचार, संगीता खंडारे, डॉ. सुनील शिराळे, सुवर्णा जाधव, पार्वती लहाने, प्रतिभा नागदेवते, गजानन साठे, शोभा शेळके, ॲड. आकाश भगत, अफसर खान ईसा खान, आदी होते.

 

दुचाकी आणल्या ढकलत

आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणत, पेट्रोल दरवाढीचा निषेध केला. तसेच गॅस सिलिंडर सुद्धा खांद्यावर घेत, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Agitation of Vanchit Bahujan Aaghadi against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.