नृत्याविष्कारातून उलगडली कृषी संस्कृती
By admin | Published: September 21, 2014 11:01 PM2014-09-21T23:01:09+5:302014-09-22T01:25:50+5:30
अकोला येथील कृषी विद्यापीठात युवा महोत्सव; विद्यार्थ्यांची थिरकली पावले.
विवेक चांदूरकर/ अकोला
आपण ज्या भागात राहतो तेथील जनजीवन, समस्या आणि सांस्कृतिक वारसा घेऊन विद्यार्थ्यांनी नृ त्याविष्कारातून कृषी संस्कृती उलगडली. आम्ही, आमचे गाव, शेती व द-या- डोंगर आम्हाला कसे प्रिय आहेत, याची जाणीव विद्यार्थ्यांनी लोकनृत्यातून उपस्थितांना करून दिली. उत्कृष्ट कलाकृती, नृत्यातील लय, ताल यांच्यात साधम्र्य साधत प्रचंड इच्छाशक्ती व अफाट मेहनतीच्या बळावर विद्या र्थ्यांंनी सादर केलेल्या लोककलेतून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शनिवारपासून युवा महोत्सव सुरू आहे. संपूर्ण विदर्भातील विविध महाविद्यालयातील मुले यामध्ये सहभागी झाले आहेत. युवा महो त्सवाच्या दुसर्या दिवशी विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्याविष्कार सादर केला. भारत हा विविधतेने नटलेला देश असून, अनेक संस्कृती येथे नांदतात. या संस्कृतींचे दर्शन शनिवारी विद्यापीठातील महोत्सवात बघायला मिळाले. कर्मा, गौंड, पावरा, छत्तीसगड, पंजाबमधील भांगडा, आदिवासी नृत्य प्रकारासोब तच गोंधळ, जोगवा, लावणी हे नृत्य विद्यार्थ्यांंनी सादर केले. नृत्याला साजेशी वेशभूषा, रंगरंगोटी व लयबद्ध संगीताने तरुणाईने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांंनी खचाखच भरलेल्या डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात स्पर्धेतील प्रत्येक नृत्याला दाद देताना तरुणाई बेभान झाली होती.