कंत्राटी कामगारांना आरोग्य सेवा न मिळाल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:54 AM2020-12-04T04:54:29+5:302020-12-04T04:54:29+5:30
कामगारांसाठी अकोल्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची सुविधा नाही. त्यांना स्वतःच्या इलाजासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागते. अकोल्यातील ईसआयसी दवाखान्यामध्ये उपचाराऐवजी फक्त ...
कामगारांसाठी अकोल्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची सुविधा नाही. त्यांना स्वतःच्या इलाजासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागते. अकोल्यातील ईसआयसी दवाखान्यामध्ये उपचाराऐवजी फक्त सुट्ट्याच मिळतात. कामगारांना उपचारासाठी मात्र नागपूरसाठी रेफर केले जाते. कामगार राज्य विमा योजना (ईएसआयसी ) च्या गैर प्रकाराविरुद्ध औष्णिक विद्युत केंद्र पारस व येथील समस्त कामगारांनी मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. करिता समस्त कंत्राटी कामगारांनी आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. निवेदन देऊन काम झाले नाहीतर जिल्ह्यातील सर्व कामगारांना जिल्हाभर आंदोलन करावे लागेल, असा इशाराही संघर्ष कंत्राटी कामगार समितीचे अध्यक्ष सतीश तायडे, उपाध्यक्ष नितेश तायडे यांनी दिला आहे.