केंद्राने मंजुर केलेले कृषी कायदे हे काँग्रेस-राष्ट्रवादीचीच देण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:11 AM2021-02-05T06:11:36+5:302021-02-05T06:11:36+5:30

अकाेला : केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे हे भाजपने नव्याने तयार केलेले कायदे नाहीत तर २००६ मध्ये काॅॅंग्रेसत्रराष्ट्रवादी ...

The agricultural laws approved by the Center are the gift of the Congress-NCP | केंद्राने मंजुर केलेले कृषी कायदे हे काँग्रेस-राष्ट्रवादीचीच देण

केंद्राने मंजुर केलेले कृषी कायदे हे काँग्रेस-राष्ट्रवादीचीच देण

Next

अकाेला : केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे हे भाजपने नव्याने तयार केलेले कायदे नाहीत तर २००६ मध्ये काॅॅंग्रेसत्रराष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता असताना त्यांच्या कार्यकाळात या कायद्यांना मूर्त रूप देण्यात आले हाेते. त्यामुळे आज या कायद्यांना विराेध करून काँग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेस जनतेची दिशाभुल करत असल्याचा आराेप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

दिल्लीत सुरू असलेल्या आंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन करण्यात आले यावेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते. ते म्हणाले की २००६ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सरकार देशात हाेते. यावेळी १९ जुलै २००६ मध्ये राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये सध्याच्या कृषी कायद्यांमधील सर्वच कलमांचा अंतर्भाव केलेला आहे. सध्याच्या माेदी सरकारने हाच कायदा मंजूर केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रती खाेट्या प्रेमाचा पुळका आणून आज काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेस आंदाेलन करत आहे. ही सपशेल दिशाभूल असल्याचे ते म्हणाले. एनआरसीच्या विराेधात मुस्लीम समाज माेठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला हाेता. आज शेतकरी आंदाेलन सुरू असताना मुस्लीम समाज कुठेही नाही, असा अपप्रचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आहे हे सर्वस्वी चुकीचे आहे. देशातील मुस्लीम समाज हा शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे हे स्पष्ट करण्यासाठीच बुधवारी धरणे आंदाेलन केल्याचे त्यांनी सांगितले.

बाॅक्स

झेंडा फडविणारा भाजपाचा कार्यकर्ता

दिल्लीतील शेतकरी आंदाेलनाला बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपचे सरकार करत आहे. प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर झेंडा फडविण्याचा प्रयत्न शेतकरी आंदाेलकांनी केला असा आराेप भाजपच्या गाेटातून हाेत आहे. हा आराेप सपशेल खाेटा असून झेंडा फडकविणारा भाजपाचा कार्यकर्ता आहे. त्याचे नाव दीप सिद्धू असल्याचे ॲड. आंबेडकर म्हणाले.

Web Title: The agricultural laws approved by the Center are the gift of the Congress-NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.