देशाला उत्तम कृषी शास्त्रज्ञ देणार! - आदित्य कुमार मिश्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 11:20 PM2020-02-06T23:20:39+5:302020-02-07T11:00:55+5:30
केंद्रीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. आदित्य कुमार मिश्रा यांचा ‘लोकमत’शी संवाद
- राजरत्न सिरसाट
अकोला : देशातील वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याची पूर्तता आता करावी लागणार आहे. तद्वतच शेतकºयांच्या शेतमाल उत्पादन आणि उत्पन्नात भर घालण्यासाठी मूल्यवर्धनासोबतच त्यांना बाजारपेठ उपलब्ध करू न देणे गरजेचे आहे. यादृष्टीने देशातील कार्यक्षम शास्त्रज्ञांची निवड करू न (आयसीएआर)भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संस्थांना मिळवून देणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. आदित्य कुमार मिश्रा यांनी खास ‘लोकमत’ला दिली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी ते अकोला येथे आले होते.
प्रश्न: ‘आयसीएआर’च्या देशात व या राज्यात किती संशोधन संस्था आहेत?
उत्तर: देशात ११० वर संशोधन संस्था असून, या राज्यात आठच्यावर संस्था आहेत. देशात जितकी पिके घेतली जातात, त्या सर्व पिके, संशोधनावर या संस्थांमध्ये काम चालते. या राज्यात कापूस, संत्रा, द्राक्ष, डाळिंब, कांदा, अद्रक, माती परीक्षण व भूमी नियोजन इत्यादी संस्था आहेत. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, कांदा, अद्रक आदींवर काम केले जाते. नागपूर येथे कापूस, संत्रा, माती परीक्षणावर काम करण्यात येत आहे. तसेच कृषी विद्यापीठांनाही आयसीएआरचे संशोधन प्रकल्प दिले जातात.
प्रश्न: या माध्यमातून या राज्यातील शेतकºयांना काय मिळणार?
उत्तर: कोणाला काय मिळणार, हे महत्त्वाचे नाही, तर शेतकºयांचे उत्पादन व उत्पन्न दुप्पट करणे, हे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यानुषंगाने काम करायचे असून, शेतकºयांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी कार्यक्षम अधिकारी, शास्त्रज्ञांची गरज भासणार आहे. तेच काम शास्त्रज्ञ भरती मंडळ करणार आहे.
प्रश्न: याच संस्थांसाठी कार्यक्षम शास्त्रज्ञांची निवड करणार का?
उत्तर: देशात नैसर्गिक संसाधने मुबलक आहेत. या संसाधनांचा वापर करू न शेती व शेतकरी कसा समृद्ध होईल, हे महत्त्वाचे आव्हान आहे. कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवायचे असेल, तर तसे शास्त्रज्ञ, संचालक हवे आहेत. आयसीएआरच्या मागणीनुसार आम्ही देशातील विविध संस्थांमध्ये काम करणारे शास्त्रज्ञ शोधून, गुणवत्तेनुसार भरती करणार आहोत. प्रश्न: सध्या किती शास्त्रज्ञांची निवड केली? उत्तर: आम्ही वरिष्ठ शास्त्रज्ञ, (डायरेक्टर) संचालक भरती करीत असतो. आयसीएआरच्या मागणीनुसार ७२ संचालक, शास्त्रज्ञांची भरती करायची आहे. त्यातील ८ जागा भरण्यासाठीच्या मुलाखती घेतल्या असून, सहा जणांना वेगवेगळ्या संशोधन संस्थांमध्ये कार्यरत होण्याचे पत्र दिले आहे. इतर जागा लवकरच भरण्यात येणार आहेत.