महापरीक्षा पोर्टलवर कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना डावलले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 04:05 PM2018-05-04T16:05:19+5:302018-05-04T16:05:19+5:30
अकोला : राज्य शासनाच्या महापरीक्षा पोर्टलमार्फत घेण्यात येणाऱ्या सहायक क्षेत्र अधिकारी गट ब या पदाच्या शैक्षणिक अर्हतेतून उद्यान विद्याशास्त्र, वनविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व जैव तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना डावलले आहे.
अकोला : राज्य शासनाच्या महापरीक्षा पोर्टलमार्फत घेण्यात येणाऱ्या सहायक क्षेत्र अधिकारी गट ब या पदाच्या शैक्षणिक अर्हतेतून उद्यान विद्याशास्त्र, वनविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व जैव तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना डावलले आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय असून, शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली असून, यासंदर्भात गुरुवार, ३ मे रोजी महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांना भेटून विद्यार्थ्यांनी निवेदन दिले.
या सर्व पदव्या कृषीशी संबंधित आहेत. असे असताना शासनाने या पदव्या पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना कृषी संबंधित विभागाच्या नोकर भरती प्रक्रि येतील शैक्षणिक अर्हतेमध्ये या पदव्यांचा उल्लेखच केला नसल्याचे विद्यार्थ्यांची तक्रार आहे. २०१५ ला घेण्यात आलेल्या सहायक क्षेत्र अधिकारी गट ब परीक्षेमध्ये उद्यान विद्या शास्त्र, वनविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व जैव तंत्रज्ञान पदव्यांचा समावेश होता. तथापि यावर्षी या पदवी घेणाºया विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज करण्यात सुद्धा डावलण्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. सर्व विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना या जागांच्या परीक्षेसाठी पात्र ठरवावे, असे या विद्यार्थ्यांनी अर्जात नमूद केले. या निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, कृषिमंत्री व संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत.