‘कृषी’च्या विद्यार्थ्यांनी प्रथम शेतात जावे! -  सुधीर मुनगुंटीवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 01:29 PM2019-02-06T13:29:15+5:302019-02-06T13:29:33+5:30

कृषी पदवी घेणाºया विद्यार्थ्यांनी प्रथम शेतात जावे, असे आवाहन अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी येथे केले.

Agricultural students should first go to the field! - Sudhir Mungantiwar | ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांनी प्रथम शेतात जावे! -  सुधीर मुनगुंटीवार 

‘कृषी’च्या विद्यार्थ्यांनी प्रथम शेतात जावे! -  सुधीर मुनगुंटीवार 

googlenewsNext

अकोला: आपल्याला देवाने मुबलक निसर्गधन, शेत, जमीन दिली; पण इतक्या वर्षांत तिची निगा, आरोग्य, सेवा करण्यात आपण कमी पडलो. म्हणूनच भविष्यात प्रचंड वाढलेल्या लोकसंख्येची भूक भागविण्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यापुढे वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येची भूक शमवायची असेल, तर शेतीची सेवा करावी लागणार असून, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे संशोधन, तंत्रज्ञान विकसित करावे लागणार आहे. त्यासाठी कृषी पदवी घेणाºया विद्यार्थ्यांनी प्रथम शेतात जावे, असे आवाहन अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी येथे केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३३ व्या दीक्षांत समारंभात अर्थमंत्री बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कृषी व महसूल मंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्र-कुलपती चंद्रकांत पाटील होते. दीक्षांत पीठावर महाराष्टÑ कृषी, शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे, उत्तर प्रदेशच्या झाशी येथील राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरविंद कुमार, डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार रणधीर सावरकर, आमदार संजय रायमुलकर यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम प्र-कुलपती चंद्रकात पाटील यांनी कृषी विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर व पीएचडीच्या २०६८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. सर्वाधिक सुवर्ण पदके प्राप्त करणारा कृषी पदव्युत्तर शाखेचा प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी लालसिंग राठोड व तीन सुवर्ण पदकांसह तीन रोख पारितोषिके पटकावणारी कृषी पदवी अभ्यासक्रमाची प्रावीण्यप्राप्त विद्यार्थिनी स्नेहल विनय चव्हाण यासह इतर २७ सुवर्ण, १६ रौप्य व तीन रोख पारितोषिके प्र-कुलपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी पुढे बोलताना, मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना मनोजकुमार यांच्या ‘उपकार’ चित्रपटातील ‘मेरे देश की धरती, सोना उगले उगले हिरे मोती’ या गाण्याची आठवण करू न दिली. शेतकºयांनी नागर हाकताना त्याच्या मुखातून पुन्हा हासूर उमटावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्यादृष्टीनेच विविध योजना राबविण्यात येत आहेत. शेतकºयांची कर्जमाफी, वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला . ते म्हणाले, चार वर्षे परिश्रम घेऊन ज्या चार बाय नऊ इंचाच्या पदवीचा कागद आपण प्राप्त केला, तो कागद नव्हे तर भारतमाता, शेती विकासाचा मंत्र आहे. विद्यार्थी तूम आगे बढो, शासन तुम्हारे साथ है, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना देत त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी चालावे, असे आवाहन केले. शेतकºयांनी काळजी करू नये. कारण शासनाच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकºयांचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पदवीदान समारंभात ८० टक्के विद्यार्थिनींनीच जवळपास पदके प्राप्त केल्याने मुलांनीही हा बोध घ्यावा, त्यांच्याकडे पदके प्राप्त करताना केवळ कौतुकाने बघू नका, असे अर्थमंत्री बोलताच सभागृहात एकच हशा पिकला. प्रास्ताविक कुलगुरू भाले यांनी केले.


- कृषी विद्यापीठाला १५० कोटी
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सव आहे. म्हणूनच कृषी मंत्र्यांसोबत मला बोलावले असे बोलताना त्यांनी मी खाली हात जाणार नाही, असे सांगत १५० कोटी जाहीर केले. यातील ५० टक्के निधी संशोधनावर खर्च करावा, असेही सांगितले.

 

Web Title: Agricultural students should first go to the field! - Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.