कृषी विद्यापीठ कर्मचाºयांचा दोन महिन्यापासून संप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:07 PM2017-10-03T14:07:42+5:302017-10-03T14:07:42+5:30
‘समान काम समान वेतन’ या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांचे रोजंदारी कर्मचारी गत दोन महिन्यापासून संपावर गेले असून, २५ दिवसांपासून कर्मचाºयांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यातील तिघा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने मागील आठवड्यात त्यांना सर्वोपचारमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यांच्या जागी नीळकंठ जवळकर व मारोती खिल्लारे उपोषणाला बसले असून,त्यांची प्रकृती खालावत आहे.
अकोला : ‘समान काम समान वेतन’ या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांचे रोजंदारी कर्मचारी गत दोन महिन्यापासून संपावर गेले असून, २५ दिवसांपासून कर्मचाºयांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यातील तिघा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने मागील आठवड्यात त्यांना सर्वोपचारमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यांच्या जागी नीळकंठ जवळकर व मारोती खिल्लारे उपोषणाला बसले असून,त्यांची प्रकृती खालावत आहे.
कृषी विद्यापीठाच्या रोजदांरी कर्मचाºयांनी संप पुकारल्याने खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.मूग,उडिदाचे पीक हातचे गेले असून, आता कापूस, तूर व इतर पिकांवर परिणाम झाला आहे. खरीपानंतर रब्बी हंगामाची तयारी सुरू आहे.पण कर्मचाºयांच्या मागण्यावर अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने कर्मचाºयांनी आंदोलन तीव्र केले आहे. चाचणीसाठी पेरणी करण्यात आलेल्या देशी बीटी कापसाचेही नुकसान झाले आहे. किटकनाशकांची फवारणी केली नसल्याने या पिकावर किडींचा प्रादुर्भावही झाला आहे. ठिबकव्दारे या पिकाला पाणी देण्यात येत होते तेही अनेक दिवसापासून बंद असल्याने हे पीक वाळण्याच्या स्थितीत आहे. संपाचा परिणाम म्हणून कृषी विद्यापीठाचे अधिकारी,शास्त्रज्ञांना रात्रीची गस्त घालावी लागत आहे. पण सर्वच ठिकाणी अधिकारी फिरू शकत नसल्याने कृषी विद्यापीठात चोºया वाढल्या आहेत या कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. विलास भाले मागील आठ दिवसापुर्वी रू जू झाले आहेत. कुलगरू रू जू झाल्यानंतर तोडगा निघेल अशी कर्मचाºयांना अपेक्षा होती पण अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही.
.दरम्यान, मागील २५ दिवसापुर्वी कुसूम देवानंद कांबळे, काशीनाथ मेश्राम, रमेश चके्र हे उपोषणाला बसले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सर्वोपचारमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यांच्या जागी नीळकंठ जवळकर व मारोती खिल्लारे हे मंगळवारपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृतीही खालावत आहे.