कृषी विद्यापीठाला आता संरक्षित सिंचनाचा आधार!
By admin | Published: July 6, 2015 01:34 AM2015-07-06T01:34:36+5:302015-07-06T01:34:36+5:30
माना टाकलेल्या सोयाबीनला स्प्रिंकलरने पाणी; कृषी विद्यापीठाच्या संशोधनावर परिणाम.
अकोला : पाऊस नाही, तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा पाण्याचा मुख्य स्रोत बंद झाल्याने माना टाकणारी पिके व संशोधनाचे प्लॉट संरक्षित ओलितावर जगविले जात असून, त्यासाठी स्प्रिंकलरने पाणी दिले जात आहे. मुख्य बीजोत्पादन क्षेत्र वणीरंभापूर, मध्यवर्ती संशोधन केंद्रांतर्गत सर्वाधिक शेतजमीन आहे. या दोन्ही प्रक्षेत्रावर विविध संशोधन केंद्र आहेत; पण पाणीच उपलब्ध नसल्याने या संशोधन कें्रदांतर्गत संशोधनाचे काम करणार्या शास्त्रज्ञांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्र व राज्य शासन संशोधनाकरिता निधी उपलब्ध करू न देते. तथापि यावर्षी पाऊस नाही आणि पाण्याचा कायमस्वरू पी स्रोत उपलब्ध नसल्याने खरीप पिकावर परिणाम झाला आहे. या कृषी विद्यापीठाला या अगोदर मोर्णा धरणातून पाणी मिळत होते. या पाण्यावर कृषी विद्यापीठाच्या शरद सरोवरात मुबलक पाणी असायचे. हे सरोवर कृषी विद्यापीठाची मुख्य धमणी आहे. या तलावातून ग्रॅव्हिटीने पाणी संशोधन प्रकल्पापर्यंंत सोडले जायचे; पण अलीकडच्या काही वर्षात कृषी विद्यापीठाला मोर्णा धरणातून पाणी मिळणे बंद झाले आहे. त्याचा परिणाम संशोधनावर होत आहे. यावर्षी अकोल्यातील मध्यवर्ती संशोधन प्रकल्पाच्या ११५0 हेक्टर क्षेत्रापैकी केवळ २0 टक्के क्षेत्रावर खरि पाची पेरणी करण्यात आली आहे. पाऊस नसल्याने कृषी विद्यापीठाच्या पेरण्यावर परिणाम झाला आहे. आजमितीस जेथे पाणी उपलब्ध आहे. ते थील माना टाकणार्या पिकांना स्प्रिंकलरने पाणी देऊन पिकांना आधार दिला जात आहे. कृषी विद्यापीठाच्या पश्चिम विभागांतर्गत बीजोत्पादनासाठी सोयाबीन पेरणी करण्यात आली आहे. तथापि पाऊस नाही आणि तापमान वाढल्याने या पिकाने माना टाकल्या आहेत. त्यासाठी संरक्षित ओलित करण्यात येत आहे.