आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा - तिवारी

By admin | Published: January 23, 2016 01:53 AM2016-01-23T01:53:46+5:302016-01-23T01:53:46+5:30

शेतकरी आत्महत्यांमागील कारणांची समीक्षा करू न कृषी धोरण आखण्यासाठी शासनाला मदत करण्याचे अवाहनकिशोर तिवारी यांनी शुक्रवारी कृषिशास्त्रज्ञांना केले.

Agricultural University should take initiative for preventing suicides - Tiwari | आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा - तिवारी

आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा - तिवारी

Next

अकोला: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, कृषी विद्यापीठांनीदेखील शेतकरी आत्महत्यांमागील कारणांची समीक्षा करू न कृषी धोरण आखण्यासाठी शासनाला मदत करावी, असे आवाहन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शुक्रवारी कृषिशास्त्रज्ञांना केले.
अकोल्याचे खासदार संजय धोत्रे व आमदार तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य रणधीर सावरकर यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. पंदेकृवि कुलगुरू कार्यालय सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या आढावा सभेला खा. संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर, कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तिवारी पुढे म्हणाले, कृषी विद्यापीठांकडे असलेले अपुरे मनुष्यबळ बघता, कृषी विद्यापीठांनी त्यांना लागणारी संसाधने व मनुष्यबळाची गरज व इतर समस्या काय आहेत, त्या स्पष्ट कराव्यात. म्हणजे या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करता येईल. ह्यकै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनह्ण या नावातच संस्थेचा उद्देश प्रतीत होत असून, शिक्षण, शेतकरी व कृषी विद्यापीठाची सांगड घालण्यासह शेतकरी कृषिक्षेत्रातील अद्ययावत माहितीसंदर्भात कसा समृद्ध होईल, असे प्रयत्न करण्यात येत आहेत. तद्वतच शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही, याची सामूहिक जबाबदारी विद्यापीठाच्या सहकार्याने उचलण्याचे आवाहनही तिवारी यांनी केले.

Web Title: Agricultural University should take initiative for preventing suicides - Tiwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.