कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान गावागावात पोहोचवणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 03:39 PM2019-01-30T15:39:08+5:302019-01-30T15:39:16+5:30
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विकसित संशोधन, तंत्रज्ञान विदर्भातील गावा-गावात पोहोचविण्याचा संकल्प कृषी विद्यापीठाने केला आहे.
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विकसित संशोधन, तंत्रज्ञान विदर्भातील गावा-गावात पोहोचविण्याचा संकल्प कृषी विद्यापीठाने केला आहे. शास्त्रज्ञ, विद्यार्थ्यांचा यात सहभाग राहणार असून, यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कृषी विद्यापीठाने १६९ विविध पिकांचे वाण, १ हजार पाचशेच्यावर तंत्रज्ञान विकसित केले आहे. शाश्वत शेतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे संशोधन, तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचविण्याची गरज आहे. या अनुषंगाने कृषी विद्यापीठाच्या स्थापनेच्या ५० व्या वर्षानिमित्त या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञान, संशोधनाचा वापर करावा, यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येणार असून, प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत. गावा-गावात सरपंच मेळावे घेतले जाणार आहे. ज्या गावात मेळावा घेण्यात येईल तेथे प्रत्येक शेतकºयांची घरी भेटी देऊन पीक पद्धतीनुसार मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकºयांना कृषी विद्यापीठाची कृषी संवादिनी, दैनंदिनीचे वितरण करण्यात येणार आहे. प्रगतिशील शेतकºयांचा परिसंवाद घेण्यात येणार असून, त्यांच्या प्रेरणादायी यशकथा शेतकºयांना सांगण्यात येणार आहेत.
यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातंर्गत सर्व महाविद्यालयांचे विद्यार्थी, कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांचा सहभाग राहणार आहे. हे सर्व विदर्भातील गावा-गावात भेटी देणार आहे. मातीच्या आरोग्यपत्रिकेनुसार पीक घ्यावे, जमिनीची पोत सुधारावी, सूक्ष्म अन्नद्रव्य आदीचा वापर कसा वाढवावा, हे देखील शेतकºयांना समजावून सांगितले जाणार आहे. या कामी कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. शाश्वत शेती विकासासाठी या सुवर्णमहोत्सवी वर्षात यावर्षी अशा विविध कार्यक्रमांचे नियोजन कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांनी केली असल्याची माहिती कृषी शिक्षण, विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी दिली.