जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव करून कृषी दिन साजरा
By रवी दामोदर | Published: July 1, 2024 04:22 PM2024-07-01T16:22:07+5:302024-07-01T16:22:18+5:30
जिल्हा परिषदेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात कृषी दिनानिमित्त कार्यक्रम झाला.
अकोला: कृषी क्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील सात तालुक्यातील २१ प्रगतशील शेतकरी व राज्य पुरस्कार प्राप्त सहा शेतकऱ्यांचा गौरव दि.१ जूलै रोजी करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात कृषी दिनानिमित्त कार्यक्रम झाला.
याप्रसंगी जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, कृषी सभापती योगिता रोकडे, सभापती आम्रपाली खंडारे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., अति. मु. का. अ.विनय ठमके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्ह्यात शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शासन पुरस्कार प्राप्त प्रयोगशील शेतक-यांचा यावेळी मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.