उत्पादनाची तफावत भरू न काढण्यावर कृषी विभागाचा भर!
By admin | Published: April 24, 2017 02:00 AM2017-04-24T02:00:11+5:302017-04-24T02:00:11+5:30
अकोला: पश्चिम विदर्भात यावर्षी खते व बियाण्यांचा मुबलक साठा असून, आता उत्पादनाची तफावत भरू न काढण्यावर कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.
अकोला: पश्चिम विदर्भात यावर्षी खते व बियाण्यांचा मुबलक साठा असून, आता उत्पादनाची तफावत भरू न काढण्यावर कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. वऱ्हाडातील शेतातील कर्बाचे प्रमाण घसरले असून, त्याचा परिणाम उत्पादकतेवर होत असल्याने उपाययोजना करण्यावर भर द्यावा लागणार आहे. दरम्यान, ७ हजार ७५ कोेटी पीक कर्जाचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत २० टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे.
पश्चिम विदर्भात खरीप हंगामाचे जवळपास ३२ लाख हेक्टर क्षेत्र असून, यामध्ये १६ लाख हेक्टर सोयाबीनचे आहे. कापसाची पेरणी यावर्षी जवळपास ९ लाख हेक्टरपर्यंत होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. कृषी विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार मागच्या वर्षी शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पादन झाले आहे. सोयाबीनचे उत्पादन सरासरी हेक्टरी १२ ते १४ क्विंटल झाले हे उत्पादन कमी असून, हेक्टरी ३० क्विंटलपर्यंतचा उतारा येऊ शकतो, असा कृषी विभागाने अभ्यास केला आहे. त्यादृष्टीनेच यावर्षी पावले उचलण्यात आली असून, येत्या २८ मे ८ जूनपर्यंत पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कृषी विभागाच्यातर्फे याबाबत प्रबोधन व मार्गदर्शन केले जाणार आहे.
शेतकऱ्यांनी मातीचे आरोग्य तपासून शेती करावी म्हणजे अनावश्यक खर्च टळेल व उत्पादन भरपूर घेता येईल या करिता शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्यात येत आहे. अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात १६ लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करायचे आहे त्यातील आतापर्यंत ११ शेतकऱ्यांना लाख मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले आहे. उत्पादनातील तफावत भरू न काढण्यासाठी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल, त्या दृष्टीने कृषी विभागाने पाऊल उचलले आहे. पीक कर्ज वाटपाला सुरुवात झाली आहे.
सरासरी उत्पादनातील तफावत भरू न काढण्यासाठी यावर्षी भर देण्यात आला आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. २८ मे ८ जून या सप्ताहात शेतकऱ्यांना याबाबत माहिती दिली जाणार आहे.
शु.रा. सरदार, विभागीय कृषी संयुक्त संचालक, अमरावती.