कृषी विभागाचे नियोजन ‘फेल’!

By Admin | Published: September 17, 2014 02:44 AM2014-09-17T02:44:22+5:302014-09-17T02:44:22+5:30

दहा टक्के क्षेत्र पडीक; उशिरा आलेल्या पावसाने बदलली समीकरणे

Agriculture Department's Planning 'Fail'! | कृषी विभागाचे नियोजन ‘फेल’!

कृषी विभागाचे नियोजन ‘फेल’!

googlenewsNext

विवेक चांदूरकर / अकोला
यावर्षी पाऊस तब्बल दोन महिने उशिरा झाल्यामुळे संपूर्ण खरीप हंगामाचीच समीकरणे बदलली आहे. कृषी विभागाने केलेले पेरणीचे नियोजन पावसाच्या विलंबामुळे विस्कळीत झाले असून, हंगाम सुरू झाल्यावर तीन महिने उलटल्यानंतरही ४0 हजार हेक्टर म्हणजेच दहा टक्के क्षेत्र पडीक आहे. शेतकर्‍यांनी कपाशीकडे पाठ फिरवित सोयाबीनचीच जास्त पेरणी केली आहे.
कपाशी बेल्ट ओळख असलेल्या वर्‍हाडातील शेतकर्‍यांनी गत आठ ते दहा वर्षांंपासून आपला मोर्चा सोयाबीनकडे वळविला आहे. वर्‍हाडात साठ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्या त येते. कृषी विभागाच्या वतीने दरवर्षी खरीप पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात येते. या नियोजनानुसार जिल्हय़ात पेरणी केल्या जाते.
यावर्षी मात्र कृषी विभागाचे नियोजन व प्रत्यक्ष शेतकर्‍यांनी केलेल्या पेरणीचा ताळमेळ बसत नाही. उशिरा व अल्प प्रमाणात झालेल्या पावसाने संपूर्ण हंगामातील चित्रच बदलले आहे. जिल्हय़ात एकूण ४ लाख ८३ हजार ८८0 हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी ४ लाख ८२ हजार ४५२ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. खरीप हंगाम सुरू होऊन तीन महिने झाले असले तरी अद्याप १0 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली नसून, हे क्षेत्र पडीक आहे. यावर्षी ४ लाख ४५ हजार ८६ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ९0 टक्के पेरणी झाली आहे.

Web Title: Agriculture Department's Planning 'Fail'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.