ग्रामीण भागातील शेती नुकसानीची कृषिमंत्र्यांनी केली पाहणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:19 AM2021-07-26T04:19:00+5:302021-07-26T04:19:00+5:30
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीस तातडीने (७२ तासांच्या आत) द्यावी, असे आवाहन माजी सैनिक कल्याण व कृषिमंत्री दादाजी ...
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीस तातडीने (७२ तासांच्या आत) द्यावी, असे आवाहन माजी सैनिक कल्याण व कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, जिल्हा कृषी अधिकारी कोताप्पा खोत आदींची उपस्थिती होती. अतिवृष्टीमुळे नदी व नाल्याकाठच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. अतिवृष्टीमुळे ज्या भागात पाणी जमा होऊन पाण्याचा निचरा होत नाही, अशा भागात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरिता तज्ज्ञ व शेतकऱ्यांच्या समन्वयाने नियोजन करू, असेही कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.
फोटो :