कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर हाेणार‎ कृषी पर्यटन केंद्र विकसित

By राजेश शेगोकार | Published: June 6, 2023 05:49 PM2023-06-06T17:49:02+5:302023-06-06T17:49:30+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी पर्यटन विकास संस्था पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार‎

Agriculture Tourism Center will be developed on the premises of the University of Agriculture | कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर हाेणार‎ कृषी पर्यटन केंद्र विकसित

कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर हाेणार‎ कृषी पर्यटन केंद्र विकसित

googlenewsNext

अकाेला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी ‎विद्यापीठ, अकोला यांनी कृषी पर्यटन ‎विकास या क्षेत्रामधील संधींचा प्रसार‎ व प्रचार होण्याच्या दृष्टीने कृषी पर्यटन ‎ ‎ विकास संस्था, पुणे यांचे समवेत ‎ कुलगुरू डॉ. ‎ शरद गडाख यांचे उपस्थितीमध्ये ‎ ‎‎ सामंजस्य करार केला आहे.‎ सदर सामंजस्य करार अंतर्गत ‎विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर कृषी पर्यटन‎ केंद्र विकसित करून त्यासाठी‎ प्रशिक्षण केंद्र सुद्धा सुरू करण्याचे ‎ ‎ प्रस्तावित आहे.

कृषी‎ पर्यटन विकास संस्था आणि‎ विद्यापीठाद्वारे कृषी पर्यटनाला‎ एकत्रितरित्या एक यशस्वी कृषी‎ व्यवसाय म्हणून नाव रूपास‎ आणण्याचे ध्येय आहे. कृषी पर्यटन विकास ‎संस्था, पुणे यांनी महाराष्ट्रामध्ये‎ जवळपास साडेसहाशे कृषी पर्यटन‎ केंद्रांचे जाळे निर्माण केले आहे आणि सदर संस्थेने कृषी पर्यटन विकासाचे ‎ ‎ विविध प्रकारचे मॉडेल्स विकसित‎ केले आहे. कृषी पर्यटन या क्षेत्रातील ‎ ‎ संधींकरिता तसेच कौशल्य विकास‎ च्या दृष्टीने पदयुत्तर पदविका‎ अभ्यासक्रम सुद्धा सुरू करण्याचे ‎ ‎ प्रस्तावित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

करारावेळी विद्यापीठाचे संशोधन‎ संचालक डॉ. विलास खर्चे, संचालक ‎ ‎ विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे,‎ विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुरेंद्र‎ काळबांडे, कृषी पर्यटन विकास संस्था‎ पुणे यांचे व्यवस्थापकीय संचालक‎ पांडुरंग तावरे , सदस्य अरुण‎ क्षीरसागर, पायगुडे आणि बलकवडे,‎ कृषी पद्धती व पर्यावरण केंद्राचे‎ संचालक डॉ. राजेंद्र इसाळ, कुलगुरू‎ यांचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी‎ , सहयोगी संशोधन संचालक अजय सदावर्ते, एकात्मिक शेती पद्धती‎ केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. जयंत‎ देशमुख, कृषी पद्धती व पर्यावरण‎ केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. नितीन‎ कोंडे आदी उपस्थित होते.‎

Web Title: Agriculture Tourism Center will be developed on the premises of the University of Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.